अभिजीत गेम हरला, तरीही मिळाले सुरज पेक्षा जास्त पैसे; आकडा पाहून व्हाल थक्क

On: October 7, 2024 2:15 PM
Abhijeet Sawant
---Advertisement---

Abhijeet Sawant l ‘बिग बॉस मराठी 5’चा ग्रँड फिनाले काल पार पडला आहे. या सिझनमध्ये बारामतीच्या सूरज चव्हाणने विजेतेपद पटकावलं आहे. तर प्रसिद्ध गायक अभिजीत सावंत हा दुसऱ्या स्थानी राहिला आहे. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर निक्की तांबोळी आणि चौथ्या स्थानी धनंजय पोवार हे स्पर्धक होते. मात्र यावेळी बिग बॉसचा हा सिझन 70 दिवसनातच पार पडला आहे. यावेळी विजेत्या स्पर्धकाला म्हणजेच सूरजला 14.60 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. याशिवाय एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि 10 लाख रुपयांचा ज्वेलरी वाऊचर सेट मिळाला आहे. मात्र यावेळी पराभूत झालेल्या अभिजीत सावंतने देखील या शोमधून मोठी कमाई केली आहे.

अभिजीतने बिग बॉसच्या घरात कमवले भरपूर पैसे :

बिग बॉस विजेत्या सूरज चव्हाणला एकूण 24.6 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तर सूरजला बिग बॉसकडून प्रत्येक आठवड्याला तब्बल 25 हजार रुपये फी मिळत होती. मात्र या सिझनची एकूण कमाई ही 2.5 लाख रुपये इतकी होती. मात्र बिग बॉसच्या घरात अभिजीत सावंतने दमदार खेळ खेळला आहे. तसेच फिनालेमध्ये अभिजीत सावंतला एक लाख रुपयांचा गिफ्ट वाऊचर मिळालं आहे.

याशिवाय अभिजतीने बिग बॉसच्या घरात भरपूर कमाई केली आहे. अभिजीत सावंतला बिग बॉसकडून दर आठवड्यासाठी 3.5 लाख रुपये मानधन हे मिळत होतं. त्यामुळे शोमधून त्याने तब्बल 35 लाख रुपयांची कमाई केली आहे. तसेच अभिजीतची एकूण संपत्ती ही 1.2 ते 8 कोटी रुपये इतकी असल्याचं बोललं जात आहे. त्याचप्रमाणे अभिजित हा एका परफॉर्मन्ससाठी तब्बल 6 ते 8 लाख रुपये इतकं मानधन घेत आहे.

Abhijeet Sawant l निक्की सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक :

बिग बॉस मराठी 5 च्या या शोमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ही निक्की तांबोळी होती. यावेळी निक्की ही सेकंड रनर अप ठरली आहे. तसेच निक्कीला दर आठवड्याला तब्बल 3.75 लाख रुपये मानधन बिग बॉसकडून मिळत होतं. म्हणजेच निक्कीने बिग बॉसच्या घरात जवळपास 37.50 लाख रुपयांची कमाई केली आहे.

प्रसिद्ध गायक अभिजीत सावंतला रिॲलिटी शोमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. अभिजीतने ‘इंडियन आयडॉल’ या गाण्याच्या शोचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर त्याने ‘जो जीता वही सुपरस्टार’ आणि ‘एशियन आयडॉल’ या शो मध्येही भाग घेतला होता.

News Title – Big Boss Abhijeet Sawant Prize Money

महत्त्वाच्या बातम्या-

दसऱ्याला खरेदी करा ‘ही’ बाईक; जाणून घ्या किंमत

रियालिटी शो की, सिंपथी शो…?, सुरजच्या विजयानंतर अभिनेत्रीची पोस्ट

अजितदादांचा नवा डाव! बारामतीतून नाही तर ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढवणार

“मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, तेव्हा..”; नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मराठा पॅटर्न, नेमकी काय झाली घोषणा?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now