मनसेला निवडणूक आयोगाकडून सर्वात मोठा धक्का!

On: October 30, 2024 3:39 PM
Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray l सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल 250 च्या आसपास जागा लढवण्याची घोषणा केली होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनसेने सात याद्या जाहीर करून उमेदवार देखील जाहीर केले. मात्र आता पूर्ण तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्या पूर्वीच मनसेला मोठा धक्का बसला आहे.

Raj Thackeray l ‘या’ उमेदवाराचा अर्ज बाद :

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या एका सहकाऱ्याला निवडणुकीमध्ये सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेने प्रशांत आंबेरे यांना संधी दिली होती. त्यानंतर प्रशांत आंबेरे यांनी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र अर्ज तपासणीदरम्यान प्रशांत आंबेरे यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता मनसेसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

नेमकं काय घडलं? :

मनसेचे अकोला पश्चिम विधानसभा उमेदवार प्रशांत आंबेरे यांचा अर्ज का रद्द करण्यात आला याबद्दल सर्वच नागरिकांमध्ये प्रश्न पडला आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या निकषांमध्ये बसत नसल्याने अर्जाच्या छाणणी दरम्यान आंबेरे यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या नियमानुसार विधानसभेच्या निवडणुकीकरिता 25 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीलाच उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची अट घातली आहे.

मात्र अकोला पश्चिम विधानसभेचे मनसे उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचं वय हे 25 वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांचा अर्ज छाणनी दरम्यान रद्द करण्यात आला आहे. तसेच प्रशांत अंबेरेंना वयाची 25 पूर्ण करण्यासाठी फक्त 24 दिवस कमी पडले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वयाची अट ही मूलभूत अट असल्याने प्रशांत अंबेरेंना यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे.

News Title – Big Blow To Raj Thackeray MNS

महत्त्वाच्या बातम्या-

पालघरमध्ये मोठा राजकीय ड्रामा, आता संपूर्ण वनगा कुटुंब बेपत्ता

नरक चतुर्दशीला करा ‘हे’ काम, जीवनात सुख-समृद्धीसह येईल भरभराट!

लाडकी बहीण योजना बंद…’या’ नेत्यानी केला मोठा दावा?

नोव्हेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार! पाहा सुट्ट्यांची यादी

“बारामतीकर सुज्ञ आहेत, ते मलाच निवडून देतील”; अजितदादांना ठाम विश्वास

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now