निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका!

On: October 27, 2024 4:49 PM
BJP Third Candidate
---Advertisement---

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | विधानसभेचं बिगूल वाजलं आहे, आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांकडून आतापर्यंत अनेक मतदारसंघात आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपतील राजीनामा सत्र सुरूच असल्याचं दिसतंय. बार्शीटाकळी तालुक्यातल्या जवळपास 200 च्या वर कार्यकर्त्यांनी पक्षाकडे राजीनामे दिले आहेत.

दुसऱ्या यादीतही नाव नसल्याने अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळेंचं तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येतीय. पिंपळेंऐवजी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या रवी राठींना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी थेट राजीनामे दिले आहेत.

भाजपाचे तालुकाध्यक्ष, शहर प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी हरीश पिंपळीशिवाय दुसरा उमेदवार चालून घेणार नसल्याचा इशारा पक्षाला दिलाय. हे सर्व कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेडमध्ये असल्याने त्यांना भेटायला नांदेडकडे निघाले आहेत.

हरीश पिंपळेंच्या मुर्तिजापूर येथील लकडगंज भागातील घरासमोर मतदार संघातील भाजपचे शेकडो संतप्त कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पक्षाने हरीश पिंपळेंना भाजपने उमेदवारी दिली नाही तर मतदारसंघातले 390 बुथ प्रमुख, शाखाप्रमुख पदाधिकारी एकाचवेळी राजीनामा देणार असल्याचा इशारा दिलाय.

अनेक ठिकाणी इच्छूक असलेल्या उमेदवारांना तिकीट न मिळाल्यानं नाराजीचा सूर दिसून येत आहे. त्यामुळे बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान आता सर्वच पक्षांसमोर असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा मित्रासोबतचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल!

शरद पवार गटाची अंतिम यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरुद्ध ‘हा’ नेता लढणार

‘…तर तुम्हाला एवढं झोंबलं का?’; राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले

अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; लंकेंविरोधातला उमेदवार ठरला

‘राजकारणातील टरबुज्या…’; बड्या नेत्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now