Pune News | राज्यपाल नियुक्ती आमदार म्हणून 12 पैकी 7 नेत्यांची वर्णी लागली आहे. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर हे नाराज झाले आहेत.
अजित पवारांना मोठा धक्का
राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी न दिल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे, त्यांच्यासोबत पुणे शहरातील अजित पवार गटाच्या तब्बल 600 जणांनी राजीनामा दिला आहे.
मी 2012 पासून पक्षाचं काम करतोय. गेले 14 महिने शहर अध्यक्ष म्हणून काम करतोय. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी मिळावी, अशी मागणी पदाधिकारी यांनी केली होती. पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवडे यांना संधी दिली. मग मला नाकारण्याचं कारण काय?, असा सवाल त्यांनी केलाय.
मी स्वतः राजीनामा देतो. कार्यकर्त्यांनी राजीनामा माघारी घ्यावे. सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकरांबद्दल तत्परता दाखवली. ती आमच्याबद्दल का दाखवली नाही?, असा प्रश्नही दीपक मानकर यांनी उपस्थित केला आहे.
Pune News | “त्या 24 तास तुमच्या बरोबर असतात…”
रूपाली चाकणकरांना जशी तुम्ही ताकद देता तशी ताकत आम्हाला का देत नाही? त्या 24 तास तुमच्या बरोबर असतात म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेणार का?, असा सवाल देखील त्यांनी केला.
भुजबळ साहेबांच्या घरात सगळी पद दिली तर इतर कार्यकर्त्यांना संधी कधी देणार. मी शनिवारपर्यंत हा राजीनामा अजित पवारांकडे देणार आहे. दीपक मानकरांना विधान परिषदेवर संधी मिळावी अशी मागणी पुणे शहरातील कार्यकर्त्यांनी केली होती. अजित पवारांच्या हातात हे सगळं असून पंकज भुजबळ यांना संधी दिली पण मला मात्र डावललं?, असंही मानकर म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा सत्ता आल्यास बहिणींना 3 हजार रुपये देणार; ‘या’ मंत्र्याचं आश्वासन
लॉरेन्स बिश्नोईच्या प्रेमाचा भयानक अंत, गर्लफ्रेंडमुळे बनला गँगस्टर
मी जे बोलतो ते करतो…; मराठा समाजाला मी स्वत: आरक्षण देणार






