शरद पवारांचा मोठा डाव, अजित पवारांना बसला धक्का

On: October 14, 2024 6:56 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग येतोय. फलटणमध्ये मोठा उलटफेर होताना दिसत आहे. फलटणमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केलेल्या नेत्यानेच अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडली आहे.

Ajit Pawar यांना धक्का

फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दीपक चव्हाण यांना अजित पवारांनी (Ajit Pawar) याआधीच फलटणसाठी उमेदवारी जाहीर केल्याची माहिती आहे. दीपक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाने अजित पवारांनी मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

अजित पवार यांच्या पक्षाचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाला स्वत: शरद पवार, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार अमोल कोल्हे आदी नेते उपस्थित आहेत.

“आम्हाला महायुतीत करमतच नव्हतं”

आमचे एकही काम घटक पक्षाच्या मंत्र्यांनी केले नाही. जर कामेच होत नसतील आणि सन्मान मिळत नसेल तर मग त्या सत्तेत राहून फायदा काय?, असा सवाल फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी केला. खरं तर आम्हाला महायुतीत करमतच नव्हतं. पण नेत्याने निर्णय घेतला होता. म्हणून आम्हाला जावं लागलं. शेवटी जनतेच्या प्रश्नांना महत्व असतं, असं दीपक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

“दिल्लीसमोर आम्ही झुकणारे नाहीत”

दीपक चव्हाण यांच्यासह सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीदेखील अजित पवार (Ajit Pawar) गटाची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

यावेळी बोलताना आपल्याला साम, दाम, दंड भेद सगळे वापरा असे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले आहे. मात्र त्यांनी काहीही वापरले तरी आपण स्वाभिमानी आहोत. सातारा हा स्वाभिमानी आहे आणि दिल्लीवर राज्य करणारा सातारा जिल्हा आहे. त्यामुळे दिल्लीसमोर आम्ही झुकणारे नाहीत, असं संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार’; मुख्यमंत्र्याचं मोठं विधान

उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृतीबदल महत्त्वाची माहिती समोर

सिद्दीकींच्या हत्येसाठी आरोपींनी आणला होता पेपर स्प्रे? यामागचं धक्कादायक कारण समोर

बिष्णोई गँगचं ‘पुणे कनेक्शन’, अत्यंत धक्कादायक माहिती समोर

देशातील सर्वात मोठ्या संस्थेत नोकरीची संधी; कुठे कराल अर्ज?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now