Ajit Pawar | महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना देखील प्रचंड वेग आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग होताना दिसत आहे. अजित पवारांना (Ajit Pawar) धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुलीने शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
लेक थेट बापाविरूद्ध उभी ठाकणार
भाग्यश्री आत्राम यांनी ‘घड्याळ’ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन ‘तुतारी’ फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. आता बापलेक आमनेसामने आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत लेक थेट बापाविरूद्ध उभी ठाकणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
भाग्यश्री आत्रामांनी वडिलांच्या भूमिकेला केराची टोपली दाखवत पक्षांतर केलं आहे. आपल्या लेकीने असा निर्णय घेतल्यास तिला आणि तिच्या सासरच्या मंडळींना नदीत फेकून देऊ, असा पवित्रा धर्मरावबाबांनी घेतला होती. मात्र लेकीना आत्रामांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
धर्मरावबाबा आत्राम माझे वडील आहेत, मी आशीर्वाद घेईन. मागच्या सभेत मला नदीत ढकलून देण्याची भाषा केली, ते चुकीचे होते, मंचावर अजितदादा होते, महिला आयोग अध्यक्षा होते, तरीही बोलले, असं भाग्यश्री आत्राम म्हणाल्यात.
मी घर फोडून जात नाहीये, धर्मरावबाबा नक्षल तावडीत होते तेव्हा शरद पवार यांनी मध्यस्थी केली. मी त्यांच्या उपकाराची परतफेड केली. अजितदादा यांनी म्हटले चूक झाली. तुम्हीच शरद पवार गटात या, चूक सुधारा. मी शरद पवार यांचे ऋण विसरू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
Ajit Pawar काय म्हणाले होते?
चूक भूल करू नका, बापासोबत राहा…. बापापेक्षा लेकीवर प्रेम कोणाचाच जास्त नसतं. समाजाला हे आवडत नाही, त्यासंदर्भात आम्ही देखील अनुभव घेतलेला आहे. मी त्यातून माझी चूक मान्य केली, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाग्यश्री आत्रामांना दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
खडसे निष्ठा सिद्ध करणार का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनचं आव्हान!
मलायका आरोराच्या वडिलांची हत्या?, पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टने बाॅलिवूड हादरलं
राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गटात रोहित पवार बॅकफूटवर, ‘या’ गोष्टी नडल्या?






