काँग्रेसचा भाजपला मोठा धक्का; ‘हा’ नेता करणार घरवापसी?

On: September 8, 2024 6:34 PM
Maharashtra
---Advertisement---

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीचे काही नेते महाविकास आघाडीत प्रवेश करताना दिसत आहेत. अशात आता आणखी एक नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहे.

गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसनं भाजपला (BJP) मोठा धक्का दिला आहे. माजी आमदार गोपालदास अग्रवाल भाजपला राम राम ठोकत घरवापसी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज पत्रकार परिषद घेऊन ते काँग्रेस प्रवेशाबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

‘हा’ नेता करणार घरवापसी?

गोपालदास अग्रवाल यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता, मात्र आता अग्रवाल हे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत.

13  सप्टेंबरला त्यांचा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे.  अग्रवाल यांनी पाच वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीच्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

अनेक दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, आता दिल्लीवरून त्यांच्या पक्ष प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात मोठा फटका बसला होता, महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभावाचा सामना कारवा लागला, तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. याचाच धसका घेत राज्यातील अनेक नेते पक्षप्रवेश करताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

गणेश चतुर्थीनिमित्त सरकारने घेतला मोठा निर्णय!

मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

दीपिकाच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

“शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही”

गणपती बाप्पाला ‘या’ राशीचे लोक फार प्रिय असतात!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now