टीम इंडियाच्या विजयानंतर बिग बी कडाडले! अमिताभ बच्चन यांनी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरला केलं ट्रोल

On: September 29, 2025 4:27 PM
India vs Pakistan (1)
---Advertisement---

India vs Pakistan | क्रिकेटची कोणतीही मॅच असली तरी भारत – पाकिस्तान सामन्यासारखा रोमांच कोणत्याही दुसऱ्या मॅचमध्ये पाहायला मिळणार नाही. काल 28 ऑक्टोबरला भारत – पाकिस्तानमध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना झाला, आणि या सामन्यातही असंच काहीसं झालं. कालच्या या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. याआधीच्या दोन सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवले होते. परंतु कालच्या सामन्याचे वातावरण अगदी वेगळं होतं. 41 वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला होता, आणि भारताने हा सामना जिंकताच भारतीय क्रिकेट टीमवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. (India Win)

नवव्यांदा भारताने आशिया चषक जिंकला :

41 वर्षांच्या इतिहासात नवव्यांदा भारताने आशिया चषक घरी आणला आहे. या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय टीमला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रेटींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. (Asia Cup 2025)

बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांनी सुद्धा खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. बच्चन फक्त त्यांच्या अभिनयासाठीच नाही तर त्यांच्या अगळ्या-वेगळ्या अंदाजासाठीही लोकप्रिय आहेत, आणि त्याच अंदाजात त्यांनी भारत – पाकिस्तान सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंची फिरकी घेत भारतीय खेळाडूंना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

India vs Pakistan | ‘अभिषेक बच्चन खूप चांगला खेळला’ :

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर यांनी मुलाखतीत बोलताना ‘अभिषेक शर्मा’ (Abhishekh sharma) ऐवजी चुकून ‘अभिषेक बच्चन’ असा उल्लेख केला होता. त्यावेळी अभिषेक बच्चनने याचं उत्तर दिलं होतं. पण आता मात्र अमिताभ बच्चन देखील मैदानात उतरले आहेत.

काल भारत सामना जिंकल्यानंतर बिग बींनी एक्स अकाउंटवर लिहिलं – ‘अभिषेक बच्चन (Abhishekh bachchan) खूप चांगला खेळला. तिथे जीभ अडखळली आणि इथे बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग न करताच शत्रूला अडखळवलं. जय हिंद, जय भारत, जय माँ दुर्गा.’ जाणूनबुजून त्यांनी अभिषेक शर्मा ऐवजी अभिषेक बच्चन असा उल्लेख करत पाकिस्तान खेळाडूला रोस्ट केलं, त्यांचे हे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी देखील त्यांना भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.

विकी कौशल यांनीही टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या :

जेष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam kher) यांनी सुद्धा विजयानंतर आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ‘भारत माता की जय’ असा जयघोष करून आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा, रणवीर सिंग, विकी कौशल यांनीही टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.

टीम इंडियाने मैदानात आणि त्यानंतर सेलिब्रेटी आणि नेटकऱ्यांनी मिळून पाकिस्तानला घेरले. भारताने अंतिम सामना जिंकल्यानंतर ACC (Asian Cricket Council) प्रेसिडेंट आणि PCB (Pakistan Cricket Board) चे चेअरमन मोहसिन नकवीकडून चषक घेण्यास नकार दिला.

News title : Big B gets angry after Team India’s victory! Amitabh Bachchan trolls Pakistani cricketer

Join WhatsApp Group

Join Now