हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन खोटारडी?, IPL चालू असतानाच धक्कादायक आरोप

On: April 2, 2025 9:51 AM
Kavya Maran
---Advertisement---

Kavya Maran l इंडियन प्रीमियर लीग 2025 हंगाम सुरू असतानाच सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) यांच्यातील वाद नव्या वळणावर पोहोचला आहे. आयपीएलचा थरार असतानाच स्टेडियममध्ये सामने खेळण्यापासून ते मोफत तिकिटांच्या मागणीपर्यंतचा हा वाद आता बीसीसीआयपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे या वादात काव्या मारन यांचे नाव समोर आले असून, त्यांच्यावर खोटारडेपणाचे आरोप करण्यात आले आहेत.

सनरायझर्स हैदराबाद संघाचे व्यवस्थापनाने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला एक ईमेल पाठवून थेट धमकी दिली होती की, जर अडचणी दूर न झाल्या तर ते हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमवर सामने खेळणार नाहीत. त्यांचा आरोप होता की एचसीएचे सदस्य आणि अध्यक्ष वारंवार तिकिटांची मागणी करत आहेत आणि संघ व्यवस्थापनाशी गैरवर्तन करत आहेत.

एचसीएकडून कडक उत्तर; आरोप फेटाळले :

सनरायझर्स हैदराबादच्या या आरोपांनंतर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने एका प्रेस रिलीजद्वारे प्रतिक्रिया दिली. त्यांनी काव्या मारनच्या संघावर थेट खोटे बोलण्याचा आरोप केला. एचसीएने स्पष्ट केलं की, अध्यक्ष ए. जगन मोहन राव यांनी कोणत्याही वैयक्तिक तिकिटांची मागणी केलेली नाही. 19 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत त्यांनी फक्त क्लब सचिवांना तिकिटे द्यावीत असा प्रस्ताव मांडला होता.

एचसीएने म्हटले की, “एसआरएच अधिकाऱ्यांनी अध्यक्षांवर खोटे आरोप करणे दुर्दैवी आहे. आम्ही सर्व वाद शांततेने मिटवण्यासाठी एसआरएचला चर्चेसाठी पुढे यावे, अशी विनंती करतो.” या संपूर्ण प्रकरणात काव्या मारन यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्या मारन कुटुंबातील कन्या असून, एसआरएच या संघाच्या मालकीण आहेत.

Kavya Maran l बीसीसीआयकडे तक्रार, ब्लॅकमेलिंगचा आरोप :

सनरायझर्स हैदराबाद संघाने 30 मार्च रोजी बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडे तक्रार करत एचसीएवर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला. त्यांचा दावा आहे की, एचसीए सदस्यांनी मोफत पास मागण्यावरून धमकी दिली आणि त्यांच्या एका बॉक्सवर लॉकही लावला.

विशेष म्हणजे, हा वाद एसआरएच विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (LSG) सामन्यादिवशी चिघळला होता. आता 6 एप्रिल रोजी एसआरएचचा पुढील सामना गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध होणार आहे. त्या आधी वाद मिटतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

News Title: Big Allegations on SRH and Kavya Maran: HCA Calls Them Liars in Ticket Controversy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now