महाविकास आघाडीचा महायुतीवर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

On: October 19, 2024 7:18 PM
Maha Vikas Aghadi
---Advertisement---

Mumbai | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून मतदानाला संपूर्ण एक महिना बाकी आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशात महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी महायुतीवर गंभीर आरोप केला आहे.

प्रत्येक मतदार संघात दहा हजार मतांची फेरफार सुरु आहे. मतदार यादीत गोंधळ निर्माण करण्याचं षडयंत्र उघड झालं आहे. प्रत्येक जिल्ह्यात, मतदारसंघात भाजपची टीम कामाला लागली आहे. त्याचे सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे आहेत असं दिसतं, असा गंभीर आरोप संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांनी राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

Maha Vikas Aghadi चा गंभीर आरोप

आम्ही या मतदारयादीबद्दल राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणी केल्याचं ते म्हणाले. मात्र राज्यातील निवडणूक पारदर्शकपणे होत नसल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला.

शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला ईस्ट, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर आणि धामणगाव या मतदारसंघात मतदार यादीत गोंधळ असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.

महायुतीवाल्यांना आम्ही लफंगे म्हणतो. एक प्रकारे ते पराभवाला घाबरले असल्याने लोकशाही विरोधात मोठे कट कारस्थान केलं जात आहे. त्या अनुषंगानेच आम्ही काल निवडणूक आयोगाला भेटलो होतो, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं.

Maha Vikas Aghadi | “महायुतीला हरण्याच्या भीती”

दरम्यान, महायुतीला हरण्याच्या भीतीमुळे मूळ मतदारांचं नाव कमी केली गेली आहे. राज्यातील मतदारांचं नाव काढून टाकलं जात आहे. बाहेरच्या राज्यातीलछत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील मतदारांचं आधारकार्ड जोडून 10- 10 हजार लोकांची नावं नोंदवली जात आहे. ओरिजनल मतदार हटवले जात आहे. राज्यातील अधिकारी यात सहभागी झाले आहेत. आयोगाला आम्ही माहिती दिली. आज आम्ही मेल करत आहोत, असं नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराला निवडणूक आयोगाचा झटका?

‘आता सुट्टी नाही’; यादी जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याची मोठी घोषणा!

“मतदारांना बाहेरून आणण्यासाठी ‘फोन पे’ करा”; शिंदेसेनेच्या आमदाराचं वक्तव्य

मशाल घेऊन चटके द्या; अजित पवारांना मोठा धक्का!

निवडणुकीआधी गिरीश महाजन संकटात; महिला पोलीस अधिकाऱ्याचे अत्यंत गंभीर आरोप

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now