Bilawal Bhutto | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार (Indus Waters Treaty) स्थगित केल्याने पाकिस्तानमध्ये (Pakistan) संतापाची लाट उसळली आहे. माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी सखर येथील सभेतून भारताला अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. सिंधू नदीतून एकतर पाणी वाहील किंवा भारताचे रक्त वाहील, अशी धमकी त्यांनी दिली आहे.
भारतावर खोट्या आरोपांचा ठपका
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (Pakistan Peoples Party) अध्यक्ष बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) यांनी सखरमध्ये (Sukkur) आयोजित एका रॅलीदरम्यान भारतावर (India) जोरदार टीका केली. त्यांच्या मते, काश्मीरमध्ये (Kashmir) घडलेल्या घटनेनंतर भारताने (India) आपल्या देशांतर्गत उणिवा लपवण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानवर (Pakistan) खोटे आरोप केले आहेत. पंतप्रधान मोदींनी पहलगाम (Pahalgam) हल्ल्यामागे पाकिस्तान (Pakistan) असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केल्याचा दावा भुट्टो यांनी केला.
भारताने सिंधू पाणी करार एकतर्फी स्थगित करण्याचा घेतलेला निर्णय हा कराराचा भंग आहे, असे भुट्टो (Bhutto) म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या करारान्वये भारताने (India) सिंधू नदी (Indus River) पाकिस्तानची (Pakistan) असल्याचे मान्य केले होते, मात्र आता मोदी (Modi) सरकार कोणताही करार मानण्यास तयार नाही. हा भारताचा (India) एकतर्फी निर्णय असल्याचे ते म्हणाले.
पाणी नाहीतर रक्त; सिंधूकाठी धमकी
सिंधू नदीच्या काठावर असलेल्या सखर शहरातून बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) यांनी भारताला (India) थेट धमकी दिली. “मी सिंधूच्या काठावरून भारताला (India) सांगू इच्छितो की, सिंधू आमची आहे आणि आमचीच राहणार,” असे ते म्हणाले.
“एकतर या नदीतून आमचे पाणी वाहील, नाहीतर त्यांचे (भारताचे) रक्त वाहील,” अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारताने (India) सिंधू पाणी करार (Indus Waters Treaty) स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यावर पाकिस्तानकडून (Pakistan) तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
Title : Bhutto Threatens India: Water or Blood






