मुंडेंच्या ‘त्या’ भेटीनंतर कराडचं शरणनाट्य, त्याला लपवून ठेवलं, मोठा खुलासा समोर

On: December 31, 2024 8:03 PM
Dhananjay Munde, Walmik Karad
---Advertisement---

Walmik Karad | खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड अखेरीस पुण्यात सीआयडी कार्यालयात येऊन शरण झाला. या प्रकरणावर विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. वाल्मिक कराड 22 दिवसांनी सीआयडीला नाट्यमयरित्या शरण आला. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड (Walmik Karad) अखेरीस पुण्यात सीआयडी कार्यालयात येऊन शरण झाला. या प्रकरणावर विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे.

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या दोन दिवसांपूर्वी मुंबईतील भेटीवर संशय व्यक्त केला आहे. या भेटीनंतर कराडवर कारवाईचा फास आवळला की आता तो शरण आला हे सगळं संशयास्पद आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.

‘त्या’ भेटीनंतर Walmik Karadचं शरणनाट्य

वाल्मिक कराड गेले 20 ते 22 दिवस सरकारला मिळत नव्हता. कराडला सगळ्या ठिकाणी जाऊन शोध घेत असल्याचा सरकारचा आव आणला. त्याची प्रॉपर्टी जप्त करतोय त्यांच्या घरच्या लोकांना ताब्यात घेतोय, सरकार किती कर्तव्यदक्ष हे दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न केला. पण चारही बाजूंनी सरकारवर झोड उठू लागली अनेक ठिकाणी मोर्चे काढले गेले. वाल्मिक कराड जवळच होता पण तो पोलिसांना सापडत नव्हता. पण अचानक तो आज समोर आला, हे संशयास्पद आहे, असंही भास्कर जाधव म्हणालेत.

कराडला लपवून ठेवलं…

ज्यांचा वाल्मिक कराडवर वरदहस्त आहे ज्यांचा हात त्याच्या डोक्यावर आहे, असे धनंजय मुंडे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत अतिथीगृहात भेट होते. त्यानंतर हालचालींना वेग आला. आता कराड खरोखर शरण आलाय की, काल दोन नेत्यांची अतिथीगृहावर भेट झाली त्याचा हा परिणाम आहे, याचा महाराष्ट्र शोध घेईल वाल्मिक कराडला जाणीवपूर्वक लपवून ठेवलं होतं की नव्हतं पण जाणीवपूर्वक हजर मात्र केलं जात नव्हतं, याचा आता संशय येतोय, असंही भास्कर जाधव म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…म्हणून वाल्मिक कराड शरणागती आला”, सुरेश धस यांचा मोठा खुलासा!

वाल्मिक कराडांसोबत असलेल्या व्यक्तीने सांगितला सर्व ठावठिकाणा!

‘दाते पंचांग बघून…’; कराडच्या शरणागतीवर अंजली दमानियांना संशय

“राजीनामा काय आता चिखलफेकही सहन केली जाणार नाही”; ओबीसी समाज आक्रमक

‘पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने…’; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now