Bharti Singh | भारती सिंग नाव ऐकताच आपल्या चेहऱ्यावर हसू येतं. हिंदी मनोरंजन जगात स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणारी ही विनोदी कलाकार आज टीव्हीपुरती मर्यादित राहिलेली नाही. प्रेक्षकांना हसवतानाच तिने डिजिटल प्लॅटफॉर्मवरही दमदार एन्ट्री घेतली आहे. आता ती स्वतःचे दोन युट्युब चॅनेल चालवते आणि त्यामधून तब्बल लाखोंची कमाई करतेय.
भारती सिंगचा संघर्षातून यशापर्यंतचा प्रवास
भारती सिंगनेही आयुष्यात अनेक चढउतार पहिले. ती केवळ दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधान झाले. तिच्या आईने घरकाम करून कुटुंब चालवलं आणि, लोकांनी दिलेल्या उरलेल्या अन्नावर त्यांचं जेवण सुरु होतं. या कठीण परिस्थितीतून बाहेर पडत भारतीने स्वतःच्या मेहनतीवर आणि विनोदाच्या अचूक टायमिंगवर प्रेक्षकांच्या मनावर स्थान निर्माण केलं. आणि आज ती देशातील सर्वात लोकप्रिय फिमेल कॉमेडियन आणि शो होस्टपैकी एक आहे.
भारतीने दोन वर्षांपूर्वी स्वतःचे दोन युट्युब चॅनेल्स सुरु केले होते. भारती टीव्ही (BHARTI TV) आणि लाइफ ऑफ लिम्बाचीयास (LIFE OF LIMBACHIYAAS ‘S) एका चॅनेलवर ती पॉडकास्ट करते, तर दुसऱ्यावर रोजच्या आयुष्यातील मजेशीर गोष्टींवर व्लॉग करते. या चॅनेल्सवर कोट्यवधी लोक तिच्या कन्टेन्टचा आनंद घेतात.
Bharti Singh | टीव्हीवर एका दिवसात एवढं मिळत?
अलीकडेच राज शमानीला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत भारती सिंगने तिच्या कमाई बद्दल खुलासा केला.”माझ्या एकूण कमाईपैकी ६० टक्के हिस्सा टीव्हीमधून येतो, तर ४० टक्के युट्युबमधून. पण टीव्हीवर एका दिवसात जेवढे पैसे कमावते, तेवढे युट्युबवर एका महिन्यात मिळतात”. तिचे हे विधान ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं, कारण तिची दिनही माध्यमांवरील लोकप्रियता अफाट आहे.
भारतीने पुढे हे पण सांगितलं की, ती दोन्ही माध्यमांना समान महत्व देते. “टीव्ही माझं पाहिलं घर आहे, पण युट्युबने मला माझ्या चाहत्यांच्या जवळ आणलं. दोन्ही प्लॅटफॉर्म्स माझ्यासाठी खूप खास आहेत,” असं ती म्हणाली.
भारती सिंग तिच्या यशाचं श्रेय तिच्या पती “हर्ष लिंबाचिया” ला देते. ती म्हणाली की, आधी तिला युट्युबबद्दल फारशी माहिती नव्हती, पण हर्षने तिला डिजिटल माध्यमाचं महत्व पटवून दिलं. “टीव्हीचं काम कायमस्वरूपी नसत, म्हणून युट्युबकडे लाख देणं गरजेचं आहे”. असं हर्षने तिला सांगितलं होतं. सध्या भारतीच्या ‘LOL’ चॅनेलला सुमारे ७.७८ दशलक्ष सबस्क्राइबर्स, तर ‘BHARTI TV’ ला ३० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या पॉडकास्टमध्ये ती आणि हर्ष मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींशी संवाद साधतात. संघर्षातून आलेली ही यशोगाथा आज लाखो चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.






