Bharat Brand Products | सध्या वाढलेल्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे बजेट विस्कळीत झाले आहे. भाजीपाला, तांदूळ, गहू, कांदा यांचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने कुटुंबाचा खर्च पेलणे कठीण झाले होते. अशा वेळी केंद्र सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून, ‘भारत ब्रँड’ नावाचा खास उपक्रम सुरू केला आहे. यामुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
भारत ब्रँड म्हणजे काय?
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या पुढाकाराने भारत ब्रँडची सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून सरकार थेट शेतकऱ्यांकडून धान्य व कांदा खरेदी करते. यामुळे दलालांचा खर्च वाचतो आणि वस्तू कमी दरात ग्राहकांपर्यंत पोहोचतात. (Bharat Brand Products)
– गव्हाचे पीठ बाजारात साधारण ४० रुपये किलो असताना भारत ब्रँडचे पीठ फक्त ₹३१.५० प्रति किलो मिळेल.
– तांदूळ ₹३४ प्रति किलो या दराने मिळणार आहे.
– कांद्याच्याही किमती कमी करण्यात आल्या असून, त्या सामान्यांच्या आवाक्यात राहतील. दरम्यान या उपक्रमामुळे घरगुती खर्चात लक्षणीय बचत होणार आहे.
Bharat Brand Products | कुठे मिळणार ही उत्पादने? :
या वस्तूंसाठी रेशन दुकानांमध्ये लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. सरकारने फिरत्या मोबाईल व्हॅनद्वारे ही उत्पादने थेट तुमच्या घराजवळ पोहोचवण्याची सोय केली आहे. याशिवाय, ही उत्पादने रिलायन्स रिटेल, डी-मार्ट सारख्या मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये आणि विविध ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध होणार आहेत. यामुळे खरेदी करणे आणखी सोयीस्कर होणार आहे.
महाराष्ट्राचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सणासुदीच्या काळात स्वस्त वस्तू बाजारात आल्याने इतर व्यापाऱ्यांनाही आपोआप आपले दर कमी करावे लागतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे महागाई कमी होऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल.






