Bharat Bandh | देशभरात आज 21 ऑगस्टरोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. दलित आणि आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला आहे. या आंदोलनामध्ये बसपा, चंद्रशेखर आझादची पार्टी सहभागी झाली आहे. SC/ST आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. (Bharat Bandh)
काही मीडिया रिपोर्टनुसार, या बंदला सर्वच दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच काही राजकीय पक्षही या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. बहुजन समाज पक्षानेही या बंदला समर्थन दिलंय. तर, या बंदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने राज्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आहे. कोणत्याही ठिकाणी हिंसाचार घडू नये म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांना हायअर्लटवर ठेवण्यात आलंय.(Bharat Bandh)
भारत बंदमागील कारण काय?
सर्वोच्च न्यायालयाने एससी-एसटी आरक्षणात क्रिमी लेयर तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्याला खरंच त्याची गरज आहे, त्याला आरक्षणात प्राथमिकता मिळावी, यासाठी हा निर्णय देण्यात आल्याचं न्यायालयाने म्हटलंय. या निर्णयावरून आता वाद निर्माण झाला आहे.
काही संघटनाकडून हा निर्णय म्हणजे एकप्रकारे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात काही संघटनांकडून आज 21 ऑगस्टरोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनकर्त्यांकडून संसदेत आरक्षणाच्या मुद्द्याला अनुसरून एका नव्या कायद्याची आखणी करण्यात यावी. या कायद्याला संविधानाच्या नवव्या यादीमध्ये समाविष्ट करत त्याला संरक्षित करून घ्यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.(Bharat Bandh)
आज काय सुरू काय बंद?
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुकानं, व्यावसायिक आस्थापनं बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वच व्यापारी संघटना या बंदला समर्थन करत नसल्याने काही आस्थापनं सुरू राहू शकतात. याशिवाय बॅंक, सरकारी कार्यालये, शाळाही सुरु राहणार असल्याची माहिती आहे. तसेच, रुग्णालयं आणि औषधींची दुकाने यासारख्या आपत्कालीन सेवा देखील सुरू राहणार आहेत.(Bharat Bandh)
News Title – Bharat Bandh 2024
महत्त्वाच्या बातम्या-
आज ‘या’ 3 राशींवर लक्ष्मी प्रसन्न होईल!
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
बदलापूर प्रकरणी शाळेची मान्यता रद्द?, बाल हक्क आयोग ॲक्शन मोडवर; मंत्री अदिती तटकरे आक्रमक
पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ तारखेला पाणी पुरवठा बंद राहणार?
पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ, बड्या नेत्याच्या घरावर ईडीचे छापे






