बंगळुरूतील घटनेनं देशभर खळबळ, फ्रीजमध्ये आढळले महिलेच्या शरीराचे 30 तुकडे

On: September 23, 2024 9:55 AM
Murder
---Advertisement---

Bengaluru Murder Case | कोलकाता रेप प्रकरणामुळे देशभर खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक संतापजनक घटना घडली आहे. बंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं दिसून आलं. येथील एका घरातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी घरात राहणाऱ्या महिलेच्या आईला आणि बहिणीला याची माहिती दिली. तेव्हा कुटुंबीयांनी घरी येऊन पाहणी केली असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. महिलेचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे आरोपीने चक्क फ्रीजमध्ये ठेवले. (Bengaluru Murder Case )

बंगळुरूच्या व्यालिकवल परिसरात शनिवारी ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय महालक्ष्मी नावाच्या तरुणीची बंगळुरू येथे हत्या झाली आहे. तिच्या पतीचे नाव हेमंत दास आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ती एकटीच राहत होती. ही हत्या 15 दिवसांपूर्वीच झाल्याची माहिती आहे.

बंगळुरूत 29 वर्षीय महिलेची निर्घुण हत्या

शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी याची माहिती महालक्ष्मीच्या नातेवाईकांना दिली. त्यांनी येऊन पाहिल्यानंतर सदर प्रकार उघड झाला. पोलिस या घटनेचा आता तपास करत आहेत. यापूर्वी देखील असाच एक धक्कादायक प्रकार घडला होता. वसईतील श्रद्धा वालकर ही तरुणी प्रियकर आफताब पूनावाला याच्यासोबत दिल्लीत राहत होती. 18 मे 2022 मध्ये आफताबने तिची हत्या केली आणि तिच्या शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. आता अशीच घटना बंगळुरू येथे घडली आहे. या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे.

बंगळुरूमधील हत्या झालेल्या महिलेच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. महालक्ष्मीच्या आईने पोलिस जबाबात मोठा खुलासा केला आहे. महालक्ष्मी आणि हेमंत दास या दोघांचं लग्न झालं. मात्र दोघांमध्ये मतभेद झाल्याने ते एकमेकांपासून वेगळे झाले. ऑक्टोबर 2023 पासून महालक्ष्मी आणि तिचा पती वेगळे राहात असल्याचं महालक्ष्मीच्या आईने सांगितलं. (Bengaluru Murder Case )

महिलेच्या शरीराचे तुकडे ठेवले फ्रीजमध्ये

पतीपासून विभक्त झाल्यानंतर महालक्ष्मी वेगळ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली. त्यावेळी तिचा भाऊ आणि त्याची पत्नी तिच्यासोबत राहिले होते. पण, दोघांचा महालक्ष्मीशी वाद झाला आणि नंतर हे दोघंही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. या घटनेबाबत सर्वप्रथम शेजाऱ्यांनी महालक्ष्मीच्या भावालाच माहिती दिली होती. या घटनेबाबत आता कसून चौकशी सुरू आहे. (Bengaluru Murder Case )

News Title : Bengaluru Murder Case

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, संभाजीराजे घेणार भेट

“आमचं चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होण्याची गॅरंटी”

आज ‘या’ राशींवर राहणार महादेवाची कृपा; सर्व इच्छा-आकांक्षा होणार पूर्ण!

MMS व्हिडीओनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडीओ तूफान व्हायरल!

शेतकऱ्यांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा, भरसभेत दिलं आश्वासन

Join WhatsApp Group

Join Now