Walmik Karad | बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. हत्ये प्रकरणानंतर कराडवर बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागीतल्याचे आरोप करण्यात आले आहेत. अशात कराडबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Walmik Karad)
वाल्मिक कराडच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन 13 डिसेंबरला मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे. इतकंच नाही तर, 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने आपल्या सहकाऱ्यांसह मध्यप्रदेशातील श्री क्षेत्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे फोटो त्यांच्याच फेसबुक अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहेत.
वाल्मिक कराड उज्जैन महाकालच्या दर्शनाला?
हे फोटो आता सोशल मीडिया आणि विविध माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या फोटोत वाल्मिक कराड यांचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारी देखील सोबत दिसून येत आहेत. या फोटोमुळे आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वाल्मिक कराड फरार असल्याचं सांगितलं जातंय आणि दुसरीकडे त्यांचे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत फोटो व्हायरल होत आहेत. (Walmik Karad)
वाल्मिक कराड महाकालेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेले होते, असं या फोटोमुळे आता समोर आलंय. हे फोटो बघून हे स्पष्ट दिसून येतंय की, कराड हे मंदिरात सामान्य भक्तांप्रमाणे दर्शन घेत होते आणि त्यांच्यासोबत यावेळी पोलीस कर्मचारी देखील होते.
वाल्मीक कराडचे फोटो व्हायरल
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशात आज वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडचे बँक खाते देखील गोठवण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर आरोपींचीदेखील बँक खाते गोठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ही कारवाई झाली.
सीआयडीकडून नुकतीच वाल्मिक कराड (walmik Karad) यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास ही चौकशी झाली. त्यातच आता कराड यांचे उज्जैनमधील हे फोटो जोरदार व्हायरल झाले आहेत.
News Title : beed sarpanch murder suspect walmik karad in ujjain
महत्त्वाच्या बातम्या-
मारहाणीचे व्हिडिओ, राजकीय नेत्यांना कॉल; सरपंच हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा
मोठी बातमी! शिंदे गटाच्या खासदाराचा भीषण अपघात
‘अचानक-भयानक महिला वर्गाविषयी पुळका..’; प्राजक्ता माळी प्रकरणी किरण मानेंची पोस्ट
सिनेसृष्टीत खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
सर्वात मोठी बातमी! वाल्मिक कराड कोणत्याही क्षणी पोलिसांसमोर सरेंडर होणार?






