मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची शक्यता?; ‘त्या’ भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

On: January 28, 2025 9:32 AM
Dhananjay Munde
---Advertisement---

Dhananjay Munde l सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) भेट घेत, बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोगचे (Massajog) सरपंच (Sarpanch) संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी (Murder Case) पुरावे सादर केले आहेत. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोमवारी दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेऊन, संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित कागदपत्रे आणि अन्य पुरावे सादर केले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दमानिया यांनी, “अजित पवारांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असून, मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी (Chief Minister) चर्चा करणार असल्याचे सांगितले,” असे त्या म्हणाल्या.

राजीनाम्यासाठी दबाव वाढला :

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत. दमानिया यांनी यापूर्वीच मुंडे यांना लक्ष्य केले होते. आता अजित पवारांच्या भेटीनंतर, मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव आणखी वाढला आहे.

“मंगळवारी दुपारी 12 वाजता अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत मी दिलेली कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांबाबत ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील,” असे दमानिया यांनी सांगितले. तसेच, “संतोष देशमुख यांच्यासोबत जे घडले ते पुन्हा महाराष्ट्रात घडू नये, असे अजित पवार यांनी आपल्याला सांगितल्याचे,” दमानिया म्हणाल्या.

Dhananjay Munde l …तर धनंजय मुंडे यांना फडणवीस राजीनामा द्यायला लावतील! :

दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) निर्णय घेण्यास समर्थ आहेत. त्यांना जर वाटले की, या प्रकरणात काही तथ्य आहे तर ते ताबडतोब मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगतील,” असे म्हणत, या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले.

दमानिया यांचा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा :

“मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार असल्याचा दावाही दमानिया यांनी केला आहे. काही कंपन्यांचे आर्थिक ताळेबंद अजित पवार यांच्याकडे दिले आहेत. यानंतरही जर मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला नाही तर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाण्याचा इशारा दमानिया यांनी दिला आहे,”

सुदर्शन घुलेचा (Sudarshan Ghule) मोबाईल लॉक (Mobile Lock) :

दुसरीकडे, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला न्यायालयीन कोठडीतून काढून पुन्हा एकदा 31 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी (CID Custody) मिळाली आहे. त्याचा मोबाईल फोन अद्याप लॉक असल्याने, या प्रकरणातील अधिक पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.

या सर्व घडामोडींमुळे, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता बळावली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

News Title : Beed-Sarpanch-Murder-Case-Anjali-Damania-Meets-Ajit-Pawar-Dhananjay-Munde-Resignation-Demand

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now