Beed | बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवतयांनी कठोर भूमिका घेतली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील पोलीस दलात झालेल्या फेरबदलानंतर, नवनीत काँवत यांनी सूत्रे हाती घेताच अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात कारवाईचा सपाटा लावला आहे. रविवारी, ११ मे (May 11) रोजी, बीडमधील वाल्मिक कराड टोळीतील काही गुंडांवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर, आता आणखी चार कुख्यात गुंडांना थेट तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
गुंडांच्या मुसक्या आवळल्या
बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील गुंडगिरी गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही धडक मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत, एकाच दिवशी चार कुख्यात गुंडांना हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. या कारवाईत माजलगाव येथील तारेख खान, वडवणी येथील विशाल डांबे, अंबाजोगाई (Ambajogai) येथील गजानन जाधव आणि बीड येथील गणेश गिरी या गुंडांचा (Goons) समावेश आहे.
या सर्वांवर विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तारेख खान याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण, चोरी यांसारखे गुन्हे (Crimes) असून, त्याला यापूर्वी तडीपारही करण्यात आले होते. विशाल डांबे (Vishal Dambe) याच्यावर छेडछाड (Molestation), जबरी चोरी आणि पॉस्को (POCSO) कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत.
गजानन जाधव (Gajanan Jadhav) हा हातभट्टी दारूची वाहतूक आणि विक्री करत होता, तर गणेश गिरी (Ganesh Giri) याच्यावर खंडणी, जाळपोळ आणि जातीय भावना भडकावल्याचे गंभीर गुन्हे (Serious Crimes) आहेत. त्यांच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आधारावर या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली असून, त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे.
संबंधित पोलीस ठाण्यांनी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. पोलीस अधीक्षकनवनीत काँवत (Navneet Kanwat) यांनी स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात गुन्हेगारी, खंडणी, अवैध दारू विक्री (Illegal Liquor Sale), वाळू तस्करी, काळाबाजार तसेच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर (Anti-social Elements) भविष्यातही मकोका आणि इतर कठोर कायद्यांतर्गत कारवाई सुरूच राहील.
Title : Beed Police Crackdown: Notorious Goons Jailed






