Beed News | महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन सोळा दिवस लोटले असताना, या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत भावनिक भाषण करताना या हत्याप्रकरणातील अनेक गंभीर बाबी उघड केल्या आहेत.
सुरेश धसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
सुरेश धस यांनी विधानसभेतील भाषणात संतोष देशमुख हत्याप्रकरणातील अनेक गुपिते उघड केली. त्यांनी सांगितले की संतोष देशमुख यांनी पवन चक्की मध्ये 2 कोटी रुपयांच्या रंगदारीच्या प्रकरणात तक्रार दिली होती, ज्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांची हत्या करण्यात आली. धस यांनी असा आरोप केला की या हत्याप्रकरणात पोलिसांना आणि आरोपींना आदेश देणारा ‘आका’ कोण हे शोधण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत.
Beed News | सुरेश धसांची मागणी काय?
सुरेश धस यांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये असे स्पष्ट केले की संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांनी सुदर्शन घुले नावाच्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. धस यांनी असा आरोप केला की सुदर्शन घुले आणि पोलिस उपनिरीक्षक महाजन यांच्यात घनिष्ठ संबंध होते आणि ते एकत्र शहरात फिरत होते. त्यांनी या प्रकरणात एका महिलेचाही समावेश असल्याचं सांगितलं आणि तिचीही चौकशी करण्याची मागणी केली.
पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि अत्याचार
संतोष देशमुख यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे स्पष्ट झाले आहे की त्यांना भयंकर रित्या मारलं गेलं. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. त्यांच्या पाठीवर दोनशे वेळा ठोके मारले गेले होते आणि त्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्त गोठले होतं. धस यांनी असा आरोप केला की या हत्याप्रकरणात पोलिसांचा संबंध असल्याचं दिसून येत आहे आणि त्यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची मागणी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यातील ‘या’ भागात मद्यधुंद कारचालकाचा हैदोस! तब्बल ‘इतक्या’ वाहनांना दिली धडक
सिनेमालाही लाजवेल असं हत्याकांड, सतीश वाघ हत्याप्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा
शेतकऱ्यांनो ‘या’ दिवशी PM किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळणार?
बीडचं वातावरण तापणार! वाल्मिक कराडसह 4 बड्या नेत्यांची नावे समोर
अलर्ट! ‘या’ जिल्ह्याला 2 दिवस वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा






