सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली; धनंजय मुंडेंची खंत अखेर ओठावर

On: September 9, 2024 4:00 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l गेल्या काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुक पार पडली. या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीदरम्यान अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे बीड मतदारसंघाकडं लागलं होत. कारण बीडमध्ये महायुतीकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनावणे निवडणुकीच्या रिंगणात उरतले होते. मात्र यावेळी पंकजा मुंडेंना पराभव पत्करावा लागला आहे. कारण मविआचे बजरंग सोनावणे यांनी विजय मिळवला आहे.

आमदार धनंजय मुंडेंनी केलं मोठं वक्तव्य :

अशातच आता राज्यात आगामी विधानसभेची तयारी सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बीड विधानसभा मतदारसंघात बाबा सिद्दिकी यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला बाबा सिद्दिकी, अजितदादा गटाचे आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी अजितदादा गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.

लोकसभा निवडणुकीत अवघ्या 6000 मतांनी आमची इज्जत गेली आहे. मात्र ही खूप खोलवर झालेली जखम आहे. ही जखम अद्याप देखील भरलेली नाही असे वक्तव्य अजितदादा गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह मुस्लिम समाज बांधवांनी देखील उपस्थिती लावली होती.

Maharashtra l पंकजा मुंडे यांच्या पराभवाची सल अद्याप :

अल्पसंख्याक मेळाव्यात आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, बीड लोकसभेत झालेल्या पंकजा मुंडे यांच्या पराभवाची सल अद्याप देखील मनात आहे. कारण अवघ्या सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली आहे. ही जखम मात्र खूप खोलवर झालेली आहे. त्यामुळे ती अद्याप भरुन निघालेली नाही असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मौलाना महामंडळासाठी दीड हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र तत्कालीन सरकारने दमडी देखील दिली नाही. आता अजितदादा या सरकारमध्ये आले आणि निधी मंजूर करण्यात आला असा दावा देखील यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे.

News Title – Beed Loksabha Election statement On Dhananjay Munde

महत्वाच्या बातम्या- 

आयफोनप्रेमींनो… जाणून घ्या iPhone 16 सिरिजची किंमत काय असणार?

पुणेकरांसाठी मोठी बातमी! समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार

‘या’ आयुर्वेदिक चहाचे फायदे ऐकून थक्क व्हाल; जाणून घ्या बनवण्याची पद्धत

मनोज जरांगेंच्या विरोधात ‘या’ मराठा नेत्याचे आंदोलन, विचारली या प्रश्नांची उत्तरे

“सोनाक्षी सिन्हाला धरावा लागणार रोजा?”; ‘ते’ फोटो शेअर करताच भडकले नेटकरी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now