वाल्मिक कराड इतक्या दिवस जेलमध्ये राहणार, समोर आली महत्त्वाची माहिती

On: January 11, 2025 1:48 PM
Akshay Athawale
---Advertisement---

बीड (Beed)  – मस्साजोग येथील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेला विष्णू चाटे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. केज येथील न्यायालयाने शुक्रवारी हा निर्णय दिला. तर, वाल्मीक कराड याला १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चाटे चौकशीसाठी पुन्हा ताब्यात?

मस्साजोग येथील सरपंच हत्या प्रकरणातील पुरवणी जबाबानुसार, विष्णू चाटे याचे नाव सहआरोपी म्हणून पुढे आले आहे. ११ डिसेंबर रोजी आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या फिर्यादीवरून वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात चाटेला अटक करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

शनिवारी पुन्हा हजर करणार-

खंडणी प्रकरणात न्यायालयाने चाटेला एकूण १९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, त्यानंतरही सीआयडी आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी केज न्यायालयात अर्ज करून, सरपंच हत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी चाटेला पुन्हा ताब्यात देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, शनिवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

धनंजय मुंडेंनी घेतली छगन भुजबळांची भेट-

दरम्यान, बीड जिल्ह्यातील विविध प्रकरणांमुळे अडचणीत आलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन, कुणाचेही मंत्रिपद काढून मला नको, अशी भूमिका मांडत मुंडेंची पाठराखण केली होती. छगन भुजबळ यांनी अनेक वर्षे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले असल्याने, त्यांच्याकडून या खात्यातील कामकाजाविषयी मार्गदर्शन घेतल्याचे मुंडे यांनी भेटीनंतर स्पष्ट केले.

Title: Extortion and Murder Conspiracy Accused in Custody

Keywords: Beed, Extortion, Attempt to murder, Walmik Karad, Vishnu Chate, Aawada Company, खंडणी, हत्येचा प्रयत्न, वाल्मीक कराड, विष्णू चाटे, आवादा कंपनी, बीड

महत्त्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! सरपंच हत्ये प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का, मात्र वाल्मिक कराडवर…

तारक मेहताच्या सोढीची प्रकृती चिंताजनक, अन्नपाणीही सोडलं

जबरदस्ती घर नावावर केलं, रिव्हॉलव्हरचा धाक दाखवून…; वाल्मिक कराडच्या मुलावर गंभीर आरोप

महाविकास आघाडीत फुट? संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

मोठी बातमी! वाल्मिक कराडचा मुलगाही अडचणीत, बंदुकीचा धाक दाखवून…

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now