चार बोटांत सोन्याची अंगठी, हातात पाचशेची नोट… पूजा गायकवाडचं ‘हे’ रिल होतंय व्हायरल?

On: September 11, 2025 10:11 AM
Govind Barge Death Case
---Advertisement---

Pooja Gaikwad | बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 34) यांच्या मृत्यूप्रकरणाने नवे वळण घेतले आहे. बार्शी तालुक्यातील सासुरे गावात त्यांचा मृतदेह गाडीत सापडल्यापासून या घटनेबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे बोलले गेले, मात्र नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने पोलिस तपास अधिक गडद झाला आहे.

दरम्यान, गोविंद बर्गे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याशी संबंधित असलेले काही खासगी आयुष्याचे धागेदोरेही समोर येत आहेत. त्यातील एक म्हणजे नर्तकी पूजा गायकवाडसोबतचे (Pooja Gaikwad) प्रेमसंबंध. पूजा गायकवाडला पोलिसांनी अटक केली असून तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

इंस्टाग्राम रिलमुळे रंगली चर्चा :

गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यूनंतर पूजाचे एक इंस्टाग्राम रिल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रिलमध्ये तिच्या हाताच्या चारही बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या दिसत आहेत. हातात पाचशेची एक करकरीत नोट असून त्यावर ती लिप्सिंग करताना दिसते. या ऑडिओचा आशय असा आहे – “मला या माणसाची विचित्र सवय लागली आहे, हा माझ्या आयुष्यातून गेला तर माझं फार अवघड होईल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja gaikwad (@p_o_o_j_a_1_1_0_7)

या रिलचा आणि गोविंद बर्गे (Govind Barge Death) यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याची चर्चा आता रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, हे रिल तिने मृत्यूच्या आठवडाभर आधी तयार केले होते. यामुळे या प्रकरणाभोवती अधिकच गूढतेचे वातावरण तयार झाले आहे.

Pooja Gaikwad | प्रेमसंबंध आणि महागड्या भेटवस्तू :

गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) यांचे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या काळात गोविंद यांनी पूजाला पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोन्याचे दागिने आणि 21 जानेवारी 2025 रोजी पावणेसात लाखांचा प्लॉटही घेऊन दिला होता. हा प्लॉट बार्शी हद्दीतील मिरगणे प्लॉटिंगमध्ये असल्याचे समजते.

अशा महागड्या भेटवस्तूंनंतरही पूजा काही दिवसांपासून गोविंदशी बोलत नव्हती. यामुळे त्यांची मानसिक अवस्था बिघडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांकडून तिची चौकशी सुरू असून पुढील तपासात या मृत्यूमागचे खरे कारण समोर येईल, अशी अपेक्षा आहे.

पोस्टमार्टेम अहवाल अद्याप समोर आला नाही. मात्र, गोविंद बर्गे हे गाडीत ड्रायव्हिंग सीटवर मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी जाऊन डाव्या बाजूने बाहेर पडली होती. आत्महत्या की घातपात, यावर अजूनही संशय कायम आहे.

News Title: Beed Crime News: Pooja Gaikwad Instagram Reel Viral After Govind Barge Death in Solapur

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now