Govind Barge Death | बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge Death) यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हादरले आहे. विवाहित असूनही त्यांनी २१ वर्षीय नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमात पडत एक वेगळाच प्रवास सुरू केला आणि त्यातूनच या घटनेला वाव मिळाला. बर्गेंनी तिच्यावर प्रचंड पैसा, सोनं, दागिने, अगदी प्लॉटसुद्धा खर्च केला. पण त्यानंतरही पूजाची लालसा वाढतच गेली. अखेर या सततच्या मागण्यांनी आणि ब्लॅकमेलिंगमुळे बर्गेंनी निराश होऊन आयुष्य संपवल्याची चर्चा आहे.
नातं कसं सुरू झालं? :
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शीतील पारगाव परिसरातील एका कला केंद्रात पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) नर्तिका म्हणून काम करत होती. अशा कला केंद्रांत नेहमीच हौशी व धनदांडग्यांची गर्दी असते. याच ठिकाणी गोविंद बर्गेंची पूजा गायकवाडशी ओळख झाली. हळूहळू ही ओळख प्रेमसंबंधांत रूपांतरित झाली. विवाहित असूनही बर्गे पूजाच्या प्रेमात एवढे गुंतले की, तिच्यावर त्यांनी अक्षरशः पैसा उधळायला सुरुवात केली.
वर्षभराच्या काळात पूजाने बर्गेंकडून लाखो रुपये, दागिने, सोनं-नाणं, महागडे मोबाईल उकळले. एवढ्यावरच ती थांबली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला बर्गेंनी पूजासाठी दीड गुंठ्याचा प्लॉट खरेदी करून दिला. मात्र त्यानंतर तिने थेट बर्गेंच्या गेवराईतील बंगल्यावर डोळा ठेवला. “बंगला माझ्या नावे करा, जमिनी माझ्या भावाच्या नावे करून द्या,” अशी मागणी पूजाने केली. बर्गेंनी मात्र याला विरोध केला.
यामुळे त्यांच्यात वाद वाढले. पूजाने त्याच्याशी बोलणं बंद केलं, शिवाय ब्लॅकमेलिंग सुरू केलं. एवढंच नव्हे तर “ऐकलं नाहीस तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन,” अशी धमकीही दिली. या सततच्या तणावामुळे गोविंद बर्गे (Govind Barge Death) निराश झाले होते.
Govind Barge Death | मृत्यूमागील संशय आणि चौकशी :
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, बर्गेंनी पूजाला समजावण्यासाठी तिच्या घरी भेट दिली होती. मात्र वाद मिटला नाही. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी कारमध्ये बसून टोकाचं पाऊल उचललं. तरीही त्यांच्या नातेवाईकांनी या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
या प्रकरणी वैराग पोलिसांनी पूजाला ताब्यात घेतले असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे. चौकशीत पूजाने बर्गेंशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांकडून आणखी पुरावे शोधले जात आहेत.
पूजाची पार्श्वभूमी :
पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) ही मूळ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पारगावची रहिवासी असून अवघ्या २१ वर्षांची आहे. सुरुवातीला ती धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुलस्वामिनी कला केंद्रात नृत्य करत असे. हे केंद्र बेकायदेशीर असल्याचा आरोप होता आणि स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन करून ते बंद करण्याची मागणी केली होती. तिथेच पूजाने पैसे उकळण्याचे आणि ब्लॅकमेलिंगचे डावपेच शिकल्याची चर्चा आहे.
गोविंद बर्गे यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. कुटुंबीय घातपाताचा संशय व्यक्त करत आहेत, तर पोलिस तपासात पूजेच्या कबुलीजबाबातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. आगामी काळात चौकशीतून आणखी गंभीर बाबी उघड होण्याची शक्यता आहे.






