माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूनंतर पूजाचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं

On: September 12, 2025 9:26 AM
Govind Barge Death Case
---Advertisement---

Govind Barge Death | बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखमसला गावात उपसरपंच राहिलेल्या गोविंद बर्गे यांच्या मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गोविंद बर्गे (Govind Barge Death) यांचा मृत्यू आत्महत्या की घातपात यावर संशय निर्माण झाला असून, या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. नुकतीच या घटनेत अडकलेल्या नर्तकी पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिने पोलिसांसमोर मोठी कबुली दिली आहे.

प्रेमसंबंध, ब्लॅकमेलिंग आणि दबाव :

गोविंद बर्गे विवाहीत असूनही त्यांनी नर्तकी पूजावर जीवापाड प्रेम केले. तिच्यासाठी पैसा, दागिने, मोबाईल इतकंच नव्हे तर घर बांधण्यासाठीही आर्थिक मदत केली. मात्र एवढ्यावरच पूजाच्या मागण्या थांबल्या नाहीत. गेवराईतील बंगला, तसेच भावाच्या नावावर जमीन करून देण्याची मागणी तिने सातत्याने केली. या मागण्या पूर्ण न झाल्यास बलात्काराचा गुन्हा लावण्याची धमकी देत ती त्यांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर आली आहे.

या दबावामुळेच बर्गे तणावाखाली होते. त्यांनी आपल्या काही मित्रांना आपली व्यथा सांगितली होती. “मी खूप निराश झालोय” अशी कबुली त्यांनी जवळच्या मित्राला दिल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे.

Govind Barge Death | पोलिस तपासात पूजाची कबुली :

या प्रकरणी गोविंद बर्गे (Govind Barge Death) यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी पूजावर थेट आरोप केले. त्यानंतर वैराग पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. सध्या ती तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत असून, चौकशीत तिने बर्गे यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले आहे. ही तिची पहिली मोठी कबुली असल्याने तपासाला नवीन वळण मिळाले आहे.

गोविंद बर्गे यांनी पूजाशी बोलणी करण्यासाठी तिच्या गावी गेल्यानंतर गाडीसमोरच त्यांनी आपले आयुष्य संपवले. परंतु ही घटना आत्महत्या आहे की घातपात, यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. कुटुंबीय आणि मित्रांनी घातपाताचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष :

दरम्यान, पोलिस तपासात असे समोर आले की मृत्यूपूर्वीच्या ५-६ दिवसांत बर्गे प्रचंड तणावाखाली होते. त्यांनी मोबाईल फोन बंद ठेवला होता आणि कुणाशीही संपर्क साधला नव्हता. यामुळे या प्रकरणात ब्लॅकमेलिंगचा गंभीर संशय बळावला आहे.

सध्या पोलिसांकडून पूजाची सखोल चौकशी सुरू आहे. तिच्या कबुलीनंतर पुढे आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गावकरी, नातेवाईक आणि मित्र या तपासाकडे लक्ष ठेवून असून न्याय मिळावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

News Title: Beed Crime: Govind Barge Death Case – Pooja’s Big Confession

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now