BCCI l ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंसाठी 10 कठोर नियम लागू केले आहेत. याचा परिणाम नुकताच दिसून आला. आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy) दुबईला (Dubai) रवाना होणार आहे, पण या दौऱ्यात बरेच बदल झालेले दिसणार आहेत. ऑस्ट्रेलियानंतर (Australia) भारताचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.
कुटुंबाला सोबत घेऊन जाण्यास मनाई :
मिळालेल्या माहितीनुसार, खेळाडूंना आपल्या कुटुंबासोबत जाता येणार नाही. बीसीसीआयने (BCCI) विमान प्रवासासाठी सामानाशी संबंधित एक नियमही तयार केला आहे.
BCCI l सामान नियमाचे कारण :
पण सामानाशी संबंधित नियम बनवण्याची गरज का भासली? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याबाबत एक खुलासा समोर आला आहे. नियमानुसार, कोणत्याही खेळाडूला 150 किलोपेक्षा जास्त सामान घेऊन जाता येणार नाही. जर जास्त वजन असेल, तर त्याचे पैसे खेळाडूंना भरावे लागतील. पूर्वी बीसीसीआय (BCCI) खेळाडूंचे पैसे भरत होते, पण आता तसे होणार नाही.
ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यातील घटना :
टीम इंडियाचा (Team India) एक खेळाडू ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यात 27 बॅग आणि ट्रॉली बॅग घेऊन गेला होता. यात क्रिकेटपटू, त्याचे खासगी कर्मचारी आणि कुटुंबाच्या बॅगा होत्या. या खेळाडूच्या सामानाचे वजन 250 किलोच्या आसपास होते. इतकेच नाही, तर ऑस्ट्रेलियातही (Australia) हा खेळाडू हे सामान घेऊन फिरला होता. त्यामुळे या दौऱ्यातील खेळाडूच्या सामानाचा संपूर्ण खर्च बीसीसीआयला (BCCI) करावा लागला, ज्याचे बिल लाखांमध्ये होते. याच खेळाडूमुळे बीसीसीआयने (BCCI) हा नियम लागू केल्याचे बोलले जात आहे, कारण इतर खेळाडूही त्याचे अनुकरण करत होते.
चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) नियम :
चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान (Champions Trophy) कोणताही खेळाडू आता वैयक्तिक कर्मचारी, जसे की आचारी, व्यवस्थापक, ट्रेनर किंवा कोणताही सहाय्यक घेऊन जाऊ शकणार नाही. खेळाडूंना सरावादरम्यान एकत्र राहावे लागेल, तसेच ठरलेल्या ठिकाणी एकत्र प्रवास करावा लागेल. इंग्लंड (England) मालिकेतही असेच काहीसे पाहायला मिळाले होते, जिथे सर्व खेळाडू एकत्र बसमधून प्रवास करत होते. त्यामुळे खेळाडूंमध्ये चांगले संबंध निर्माण झाले, असे सांगितले जात आहे.






