BCCI l भारताच्या क्रिकेट संघावर २०२५ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील लज्जास्पद पराभवानंतर मोठे परिणाम दिसून येत आहेत. 1-3 ने झालेल्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममधील गोपनीय माहिती बाहेर आल्यामुळे BCCI ने थेट तिन्ही प्रशिक्षकांवर कारवाई करत त्यांना पदावरून हटवले आहे.
कोण-कोण बाहेर? :
अभिषेक नायर – सहायक प्रशिक्षक (8 महिन्यांचा कार्यकाळ)
टी. दिलीप – क्षेत्ररक्षण प्रशिक्षक
सोहम देसाई – ट्रेनर
ड्रेसिंग रूममधून सातत्याने बातम्या बाहेर जात असल्यामुळे संघातील एक वरिष्ठ खेळाडू नाराज होता आणि त्याने यासंदर्भात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर अलीकडे झालेल्या BCCI च्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आला.
BCCI l कोण घेणार जागा? :
अभिषेक नायर (Abhishek Nair) यांच्या जागी सध्या कोणतीही नविन नियुक्ती होणार नाही. फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सीतांशु कोटक यांच्यावर जबाबदारी राहणार.
टी. दिलीप (T. Dilip) यांच्या जागी अनुभवी रायन टेन डोशेट यांना क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
सोहम देसाई (Soham Desai) यांच्या जागी एड्रियन ली रु हे नव्या ट्रेनर म्हणून जबाबदारी सांभाळणार. ते याआधी KKR आणि पंजाब किंग्जसोबत अनुभव घेऊन आले आहेत.
पुढील स्पर्धांवर परिणाम? :
हे बदल टीम इंडियाच्या व्यवस्थापनातील मोठी उलथापालथ असल्याने आगामी ICC स्पर्धांमध्ये त्याचे दूरगामी परिणाम दिसून येऊ शकतात. संघातील वातावरण सुधारण्यासाठी ही मोठी पावले उचलल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.






