रोहित-विराट ते गिलला कोणाला किती पगार मिळणार? ‘या’ खेळाडूंना मिळणार सर्वाधिक पगार

On: April 21, 2025 2:10 PM
Player Salary List
---Advertisement---

Player Salary List l भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल दरम्यान 2025-2026 वर्षासाठी भारतीय संघाचा वार्षिक केंद्रीय करार जाहीर केला आहे. यंदा एकूण 34 खेळाडूंना करार यादीत स्थान मिळाले असून, काही खेळाडूंना प्रमोशन देखील मिळाले आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, A+ ग्रेडमध्ये कोणताही बदल झाला नसून रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे चार खेळाडू 7 कोटी रुपयांच्या पगारासह याच श्रेणीत कायम राहिले आहेत.

कोणाला मिळालं प्रमोशन? :

या नव्या यादीमध्ये 9 खेळाडूंना प्रमोशन मिळाले आहे. विशेषतः, ऋषभ पंत (Rishbh Pant Salary) याला B ग्रेडमधून थेट A ग्रेडमध्ये प्रमोट करण्यात आले असून, त्याचा पगार 2 कोटींनी वाढला आहे.

श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांची पुन्हा कॉन्ट्रॅक्ट यादीत एंट्री झाली आहे. इशान किशनला थेट C ग्रेड मध्ये स्थान देण्यात आलं आहे. याशिवाय, सरफराज खान, नितीश रेड्डी, अभिषेक शर्मा, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांना देखील C ग्रेडमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे.

Player Salary List l केंद्रीय करारातील ग्रेडनुसार पगारवाटप :

BCCI च्या केंद्रीय करारात खेळाडूंना चार श्रेणींमध्ये विभागलं जातं आहे:

ग्रेड A+ (7 कोटी रुपये) – सर्व फॉरमॅट खेळणारे वरिष्ठ खेळाडू

रोहित शर्मा
विराट कोहली
जसप्रीत बुमराह
रवींद्र जडेजा

ग्रेड A (5 कोटी रुपये) – नियमित खेळाडू

हार्दिक पांड्या (Hardik Pandya Salary)
मोहम्मद सिराज
मोहम्मद शमी
केएल राहुल
शुभमन गिल(Shubhman gill Salary)
ऋषभ पंत

Player Salary List  l ग्रेड B (3 कोटी रुपये) – स्थिर कामगिरी करणारे खेळाडू

सूर्यकुमार यादव
कुलदीप यादव
अक्षर पटेल
यशस्वी जयसवा
श्रेयस अय्यर

ग्रेड C (1 कोटी रुपये) – बॅकअप खेळाडू

रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश रेड्डी, इशान किशन, अभिषेक शर्मा, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा

अजिंक्य रहाणे आणि आर. अश्विन यांचा करार यादीतून वगळण्यात आला आहे. विशेषतः अश्विनने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, त्याचमुळे त्याचं नाव यादीतून वगळलं गेलं.

News Title: BCCI Central Contract 2025-26: Rohit, Kohli in A+ Grade, Rishabh Pant, Shreyas Iyer Promoted – Full Salary List

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now