BCCI Central Contract 2024-25 l भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) वरिष्ठ पुरुष संघासाठी 2024-25 वर्षासाठीचा केंद्रीय करार जाहीर केला आहे. हा करार 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत लागू राहणार आहे. यंदा जाहीर करण्यात आलेल्या यादीत एकूण 34 खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून, रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे खेळाडू A+ ग्रेडमध्ये आहेत.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या कराराची घोषणा केली असून, यामध्ये खेळाडूंना चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकृत करण्यात आलं आहे – A+, A, B आणि C.
A+ ग्रेडमध्ये चार स्टार खेळाडू :
भारतीय संघातील चार वरिष्ठ खेळाडूंना A+ श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे. हे खेळाडू वर्षभरात सर्वाधिक सामने खेळतात व संघाच्या यशात मोलाची भूमिका बजावतात.
रोहित शर्मा (rohit sharma)
विराट कोहली (virat kohli)
जसप्रीत बुमराह (jasprit bumrah)
रवींद्र जडेजा (ravindra jadeja)
BCCI Central Contract 2024-25 l A, B आणि C ग्रेडमध्ये या खेळाडूंचा समावेश :
A ग्रेड (10 खेळाडू) :
मोहम्मद सिराज
केएल राहुल
शुभमन गिल
हार्दिक पांड्या
मोहम्मद शमी
रिषभ पंत
B ग्रेड (5 खेळाडू) :
सूर्यकुमार यादव
कुलदीप यादव
अक्षर पटेल
यशस्वी जायस्वाल
श्रेयस अय्यर
C ग्रेड (15+ खेळाडू) :
रिंकू सिंग
तिलक वर्मा
ऋतुराज गायकवाड
शिवम दुबे
रवी बिश्नोई
वॉशिंग्टन सुंदर
मुकेश कुमार
संजू सॅमसन
अर्जदिप सिंग
प्रसिध कृष्णा
रजत पाटीदार
ध्रुव जुरेल
सरफराज खान
नितीश रेड्डी
ईशान किशन
अभिषेक शर्मा
आकाश दीप
वरुण चक्रवर्ती
हार्षित राणा
बीसीसीआयकडून स्पष्टता :
केंद्रीय कराराची ही यादी खेळाडूंच्या कामगिरी, सातत्य आणि संघासाठी त्यांच्या योगदानाच्या आधारावर ठरवली जाते. यामुळेच काही नावं यंदा वगळली गेली असून काही नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला आहे. संघात चांगली स्पर्धा निर्माण होत असल्याचं संकेत यामधून मिळतात.






