भारतातील ‘या’ 5 शहरांवर बंदी; BCCI ने घेतला मोठा निर्णय

On: May 13, 2025 10:52 AM
IPL 2025
---Advertisement---

IPL 2025 | भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामानंतर काही दिवसांनी बीसीसीआयनं IPL 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. मात्र या नव्या वेळापत्रकासोबत बीसीसीआयने भारतातील 5 प्रमुख शहरांवर बंदी घालत क्रिकेटप्रेमींना मोठा झटका दिला आहे. सुरक्षा कारणास्तव ही बंदी घालण्यात आली असून, उर्वरित सामने केवळ 6 शहरांमध्येच खेळवले जाणार आहेत. (IPL 2025)

कोणत्या शहरांवर बंदी? :

बीसीसीआयच्या नव्या निर्णयानुसार चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, मुल्लानपूर आणि धर्मशाळा या शहरांमध्ये आयपीएलचे उर्वरित सामने होणार नाहीत. सीमेपासून जवळ असलेल्या ठिकाणी कोणतीही जोखीम न घेता ही बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेषतः धरमशाळा हे शहर भारत-पाकिस्तान (Ind Vs Pak) सीमेपासून अगदी काही किलोमीटरवर असल्याने, 9 मे रोजीचा सामना मध्येच थांबवण्यात आला होता. त्यानंतर युद्धविराम जाहीर झाला असला, तरी BCCI कोणताही धोका पत्करणार नसल्याचे स्पष्ट केलं.

IPL 2025 | उर्वरित सामने कुठे होणार? :

सुधारित वेळापत्रकानुसार, उर्वरित 17 सामने 17 मे ते 3 जून 2025 दरम्यान फक्त 6 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत: (IPL 2025)

बंगळुरु – एम. चिन्नास्वामी स्टेडियम
जयपूर – सवाई मानसिंह स्टेडियम
दिल्ली – अरुण जेटली स्टेडियम
लखनौ – अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम
मुंबई – वानखेडे स्टेडियम
अहमदाबाद – नरेंद्र मोदी स्टेडियम

IPL 2025च्या दुसऱ्या टप्प्यासाठी BCCIने घेतलेला हा निर्णय हा काळजीपूर्वक आणि धोरणात्मक आहे. सामने जरी मर्यादित शहरांमध्ये होत असले, तरी क्रिकेटप्रेमींना सामना पाहण्याचा अनुभव कायम ऑनलाइन आणि टीव्ही माध्यमातून मिळणार आहे.

News Title: IPL 2025: BCCI Bans Matches in 5 Indian Cities, Revised Schedule Announced After Ceasefire

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now