काकांना पाहताच जय पवारांनी केलं असं काही की…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

On: November 20, 2024 1:17 PM
Baramati Shriniwas Pawar and Jay Pawar meet
---Advertisement---

Baramati | राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडते आहे. यंदा बारामतीमध्ये लोकसभेप्रमाणेच पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे असणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरूध्द पुतण्या अशी लढत होत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात येथे शरद पवारांनी युगेंद्र पवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. (Baramati)

त्यामुळे प्रचारात देखील पवार कुटुंब एकमेकांविरोधात उतरल्याचे दिसून आले. अजित पवारांसाठी त्यांची दोन मुले जय पवार, पार्थ पवार आणि पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी प्रचार केला. तर, युगेंद्र पवारांसाठी बाकी पवार कुटुंब प्रचाराच्या मैदानात होते. स्वतः शरद पवार हे युगेंद्र पवारांसाठी प्रचारात उतरले होते. यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या पत्नी प्रतिभा ताई पवार देखील प्रचार करताना दिसून आल्या.

श्रीनिवास पवार व जय पवार गळाभेट

आज मतदानाच्या दिवशी सकाळीच अजित पवार आणि युगेंद्र पवारांनी मतदानाचा हक्का बजावला. अशातच श्रीनिवास पवार आणि जय पवार यांचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अजित पवारांचे भाऊ आणि युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार दिसताच, जय पवार यांनी केलेली कृती सर्वांच्या नजरेत आली आहे. (Baramati)

जय पवार यांनी काका श्रीनिवास पवार यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर दोघांनी एकमेकांची गळा भेट घेतली. त्यानंतर ते पुढे आपापल्या कामासाठी निघून गेले. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राजकीय आखाड्यात पवार कुटुंबाचे दोन गट पडले असले तरी समोर आल्यावर त्यांच्यातील प्रेम दिसून आल्याच्या चर्चा आता बारामतीत रंगत आहेत.

अजित पवार vs युगेंद्र पवार

दरम्यान, मतदान करण्यापूर्वी युगेंद्र पवार यांनी त्यांच्या आज्जीचा आशीर्वाद देखील घेतला. माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत सांगितले. मी आजीला भेटण्यासाठी अजित पवारांच्या घरी जायला निघालो. मी तिथे फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं, आजी कन्हेरीला यायला निघाल्या आहेत, त्यामुळे मी गाडी वळवली आणि इथं आलो आजीचा आशीर्वाद घेतला आता पुढच्या कामासाठी निघालो, असं युगेंद्र पवार म्हणाले. (Baramati)

News Title :  Baramati Shriniwas Pawar and Jay Pawar meet

महत्वाच्या बातम्या –

सत्ता स्थापनेबाबत अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘आज तुझा मर्डर फिक्स’; सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी

भाजप अन् काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; कुठं घडली घटना

मतदानाच्या दिवशी जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना मोठं आवाहन; म्हणाले..

‘विनोद तावडे निर्दोष, त्यांच्याकडे कोणताही पैसा सापडला नाही..’; फडणवीस स्पष्टच बोलले

Join WhatsApp Group

Join Now