शरद पवारांचं धक्कातंत्र सुरूच, पुण्यात भाजपच्या बड्या नेत्याकडून ‘तुतारी’चा प्रचार

On: September 9, 2024 9:00 AM
Bapusaheb Pathare may join Sharad Pawar Group
---Advertisement---

Sharad Pawar Group | काही दिवसांपूर्वीच भाजपला पश्चिम महाराष्ट्रातून मोठा धक्का बसला. शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज, भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. अशात भाजपला पुन्हा एकदा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील भाजपचा एक बडा नेता शरद पवारांच्या गळाला असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. (Sharad Pawar Group)

माजी आमदार आणि भाजपचे नेते बापूसाहेब पठारे हे भाजपला रामराम करण्याची शक्यता आहे. बापूसाहेब पठारे गणपती मंडळाच्या कार्यक्रमातून हाती तुतारी घेणार असल्याचं म्हटलं जातंय. यामुळे विधानसभा पूर्वीच भाजपला हा मोठा झटका बसू शकतो.

पुण्यातील बापूसाहेब पठारे शरद पवार गटात जाणार?

वडगाव शेरीमध्ये सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. अजित पवार सध्या भाजपसोबत सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे विधानसभेला ही जागा त्यांच्याकडेच जाण्याची दाट शक्यता आहे. भाजपला ही जागा मिळेल की नाही, याबाबत अद्याप काहीही ठरलेलं नाही.

वडगाव शेरीची जागा भाजपकडे नसल्याने बापूसाहेब पठारे नाराज आहेत. यामुळेच बापूसाहेब पठारे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. इतकंच नाही तर, ‘तुतारी’च आपलं चिन्ह असल्याचं जाहीर करत त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. (Sharad Pawar Group)

बापूसाहेब पठारे यांच्याकडून ‘तुतारी’चा प्रचार

यापूर्वी शरद पवारांनी कोल्हापुरात भाजपला धक्का दिला. आता पुण्यात भाजपला दूसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बापूसाहेब पठारे यांनी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विविध गणेश मंडळांना भेटी देत विधानसभेसाठी आपण ‘तुतारी’ हाती घेणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यांनी तुतारीला मतदान करण्याचं आवाहन देखील केलं आहे. (Sharad Pawar Group)

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. महायुतीला म्हणावी तशी छाप लोकसभेत सोडता आली नाही. या निकालानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटात अनेकांनी घरवापसी केली आहे. तर, अजूनही इनकमिंग सुरूच आहे. महायुतीमध्ये उमेदवारीमुळे अनेक नेत्यांची नाराजी समोर येत आहे. याचा फटका महयुतीला बसत आहे.

News Title –  Bapusaheb Pathare may join Sharad Pawar Group

महत्वाच्या बातम्या- 

देशात आढळला पहिला मंकीपॉक्स संशयित रुग्ण?, ‘या’ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

महादेवाच्या कृपेने ‘या’ राशींवर बरसणार सुखाच्या सरी, मिळेल शुभवार्ता

काँग्रेसचा भाजपला मोठा धक्का; ‘हा’ नेता करणार घरवापसी?

गणेश चतुर्थीनिमित्त सरकारने घेतला मोठा निर्णय!

मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

Join WhatsApp Group

Join Now