“अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसला”, भुजबळ समर्थकांची जोरदार बॅनरबाजी

On: December 18, 2024 2:18 PM
Banner against Ajit Pawar by Chhagan Bhujbal supporters
---Advertisement---

Chhagan Bhujbal | महायुती सरकारच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांना डावलण्यात आले आहे. यामुळे भुजबळ चांगलेच संतापले आहेत. त्यांच्या समर्थकांकडून देखील जोरदार निषेध केला जातोय. मंत्रीमंडळात समावेश न केल्यानं भुजबळ हिवाळी अधिवेशन सोडून थेट नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने त्यांच्या समर्थकांकडून अनेक ठिकाणी निदर्शने केली जात आहेत. अशात त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आलेल्या बॅनरबाजीची जोरदार चर्चा रंगली आहे.

छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आज नाशिकमध्ये ओबीसींचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात अजित पवार ,सुनील तटकरे , प्रफुल्ल पटेल यांनी विश्वासघात केल्याचा बॅनर घेऊन समर्थक मेळाव्यासाठी दाखल झाले आहेत. या बॅनरची राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे.

‘त्या’ बॅनरची जोरदार चर्चा

अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळ साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात केला आहे. संपूर्ण ओबीसी समाज तुम्हाला माफ करणार नाही, असं या बॅनरवर लिहिण्यात आलंय. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर पक्षाकडून अन्याय झाला, अशी भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आज नाशिकमध्ये समता परिषदेचा राज्य मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी समता परिषदेचे संस्थापक, पदाधिकारी , मुस्लिम संघटनेचे नेते शब्बीर अन्सारी उपस्थित असणार आहेत. भुजबळ यांच्यावर अन्याय झालाय. ते भाजपसोबत गेले तरी आम्ही तयार आहोत, असं शब्बीर अन्सारी म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, नाराज छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)आज आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. यावर अद्याप अजित पवार यांनी देखील काहीच भाष्य केलं नाही. त्यामुळे भुजबळ आता काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

News Title : Banner against Ajit Pawar by Chhagan Bhujbal supporters

महत्वाच्या बातम्या –

काळजी घ्या! थंडी आणखी वाढणार?, ‘या’ जिल्ह्यांसाठी IMD कडून अलर्ट

भुजबळांच्या नाराजीवर अजितदादा मोठा निर्णय घेणार?

SBI बँकेत बंपर भरती; शैक्षणिक पात्रता ते पगार, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

महायुतीने घेतला ‘या’ मोठ्या पदाचा निर्णय!

लालकृष्ण आडवाणी यांच्यावर ICU त उपचार सुरू, हेल्थबद्दल मोठी अपडेट समोर

Join WhatsApp Group

Join Now