तरुणांनो… बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

On: September 11, 2025 3:33 PM
ISRO Apprentice 2025
---Advertisement---

Bank of Maharashtra Recruitment | Bank of Maharashtra Recruitment | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) ने ऑफिसर स्केल II ते स्केल VI (Generalist Officer) या पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. एकूण 350 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका. अर्जाची प्रक्रिया, पात्रता, पगार आणि इतर महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

कोण अर्ज करू शकतात? :

या भरतीसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. बीई, बीटेक, एमएससी किंवा एमसीए पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवारांचे किमान वय 25 वर्षे आणि कमाल वय 50 वर्षे असावे. राखीव प्रवर्गांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.

Bank of Maharashtra Recruitment | अर्ज कसा कराल? :

– उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट द्यावी.

– “Click here for New Registration” वर क्लिक करून नाव, ईमेल, मोबाईल नंबर भरून रजिस्ट्रेशन करावे.

– फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून अर्ज शुल्क भरावे.

Bank of Maharashtra Recruitment | अर्ज शुल्क :

OBC/EWS उमेदवारांसाठी ₹1180

SC/ST उमेदवारांसाठी ₹118

शुल्क ऑनलाइन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग) भरता येईल.

अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया :

या भरतीसाठी उमेदवारांना प्रथम ऑनलाइन लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

निवड झालेल्या उमेदवारांना स्केलनुसार आकर्षक पगार मिळणार आहे.

स्केल VI : ₹1,40,500 – ₹1,56,500 महिना

स्केल V : ₹1,20,940 – ₹1,35,020 महिना

स्केल IV : ₹1,02,300 – ₹1,20,930 महिना

स्केल III : ₹85,920 – ₹1,05,280 महिना

स्केल II : ₹64,820 – ₹93,960 महिना

याशिवाय भत्ते आणि इतर सुविधा देखील मिळतील.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना नीट वाचावी आणि सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळे वेळेत अर्ज करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

News Title: Bank of Maharashtra Recruitment 2025 | Apply for 350 Generalist Officer Posts | Salary up to ₹1.56 Lakh

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now