Bank of Maharashtra Recruitment l जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये तब्बल 600 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक तरुण हा पदवीधर असणे गरजेचे आहे. तर आता आपण या भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
किती तारखेपर्यंत अर्ज करू शकता? :
बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने 600 शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सरकारी बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीत बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. उमेदवार ज्या भागात अर्ज करत आहे तेथील स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे. अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.
Bank of Maharashtra Recruitment l अर्ज शुल्क किती आहे? :
या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना 1 वर्षासाठी प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान, उमेदवारांना दरमहा 9000 रुपये स्टायपेंड मिळेल. निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असणार आहे. तसेच कागदपत्र पडताळणी दरम्यान काही तफावत आढळल्यास उमेदवारांना अपात्र ठरवले जाऊ शकते. तसेच Opan/EWS/OBC श्रेणीतील उमेदवारांना 150 रुपये + GST अर्ज शुल्क भरावी लागेल. तसेच एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये + जीएसटी आहे. याशिवाय PWBD श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हाताने लिहिलेली घोषणा स्कॅन करावी लागेल. हा डिक्लेरेशन फॉर्म इंग्रजीत असावा, ज्यामध्ये दिलेली सर्व माहिती खरी असल्याचे लिहिलेले असावे. उमेदवारांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा ते आधार नोंदणी आयडी वापरू शकतात.
News Title – Bank of Maharashtra Recruitment 2024
महत्त्वाच्या बातम्या-
नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
विधानसभेपूर्वीच राज्यात राजकीय स्फोट?, बच्चू कडूंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रुफ कार; किंमत ऐकून व्हाल थक्क
मोठी बातमी! आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?, मतदारसंघही ठरला?
सणासुदीत ग्राहकांना दिलासा! सोनं झालं स्वस्त?, जाणून घ्या भाव






