सप्टेंबर महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या यादी

On: August 26, 2024 3:06 PM
December Bank Holiday 2024
---Advertisement---

Bank Holidays l सप्टेंबर महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. RBI च्या हॉलिडे कॅलेंडर 2024 नुसार, भारतातील विविध क्षेत्रांमधील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका सप्टेंबरमध्ये एकूण 15 दिवस बंद राहणार आहेत. जर तुमचही बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून बँक बंद असताना तुम्हाला अडचणी येऊ नयेत.

ऑनलाईन पद्धतीने करा व्यवहार पूर्ण :

RBI ने जाहीर केलेल्या 15 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्या तसेच रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा देखील समावेश होत आहे. कारण बँकांच्या सुट्ट्यांची यादी सर्व राज्यांमध्ये सारखी नसते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, सर्व राज्यांच्या सुट्ट्यांची यादी वेगळी आहे. या सुट्ट्यांची संपूर्ण यादी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिली जाते, ज्यामध्ये प्रत्येक राज्यांनुसार विविध सण आणि सुट्ट्यांची संपूर्ण माहिती दिली आहे.

नागरिकांनो बँका बंद राहिल्या तरी ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. कारण सुट्टीच्या दिवशीही लोक ऑनलाइन बँकिंगच्या मदतीने आपली सर्व कामे पूर्ण करू शकतात. आजकाल बँकेच्या बहुतांश सेवा ऑनलाईन उपलब्ध करर्ण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी देखील नागरिक घरबसल्या बँकिंगची अनेक कामे पूर्ण करू शकता.

Bank Holidays l बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी :

1 सप्टेंबर: रविवार
४ सप्टेंबर: श्रीमंत शंकरदेवाची तिरुभव तिथी (गुवाहाटी)
7 सप्टेंबर: गणेश चतुर्थी (जवळजवळ संपूर्ण भारत)
8 सप्टेंबर : रविवार
14 सप्टेंबर: दुसरा शनिवार, पहिला ओणम (कोची, रांची आणि तिरुवनंतपुरम)
15 सप्टेंबर: रविवार
16 सप्टेंबर: बारावाफट (जवळजवळ संपूर्ण भारत)
17 सप्टेंबर: मिलाद-उन-नबी (गंगटोक आणि रायपूर)
18 सप्टेंबर: पंग-लाहबसोल (गंगटोक)

20 सप्टेंबर: ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू आणि श्रीनगर)
22 सप्टेंबर: रविवार
21 सप्टेंबर: श्री नारायण गुरु समाधी दिवस (कोची आणि तिरुवनंतपुरम)
23 सप्टेंबर: महाराजा हरिसिंह यांचा जन्मदिन (जम्मू आणि श्रीनगर)
28 सप्टेंबर : चौथा शनिवार
29 सप्टेंबर : रविवार

News Title – Bank Holidays September 2024

महत्त्वाच्या बातम्या-

‘ती आधीच सेमिनार हॉलमध्ये…’; कोलकाता रेप प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा

जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त

‘या’ राज्याचे माजी मुख्यमंत्री ‘सेक्स स्कँडल’मध्ये सामील?, खळबळजनक दावा समोर

बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री राहुल गांधींच्या मागे?

आज पावसाचा ऑरेंज, यलो, रेड अलर्ट; ‘या’ भागात पाऊस धडकी भरवणार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now