जानेवारीत तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार; पाहा सुट्ट्यांची यादी

On: December 27, 2024 11:23 AM
Bank Holiday List In January
---Advertisement---

Bank Holiday List In January l वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये देशाच्या विविध भागात तब्ब्ल 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन वर्षासाठी बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

ऑनलाईन स्वरूपाने बँकेची कामे करू शकता :

मात्र या महिन्यात अनेक दिवस बँका बंद असल्या तरी देखील तुम्ही ऑनलाईन स्वरूपाने बँकेची कामे करू शकता. त्यामुळे तुम्ही पैसे ट्रान्सफर करणं, बिल भरणं, रिचार्ज करणं, पैसे गुंतवण्यासारख्या गोष्टी बँकेच्या अधिकृत अ‍ॅप्सच्या मदतीनं करू शकता.

याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशभरातील सुट्ट्यांची यादी एकत्रितरित्या जाहीर करत असते. त्यामुळे प्रत्येक राज्यांमध्ये बँकाच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. एकंदरीत, जानेवारीत असे आठ दिवस असतील जेव्हा देशभरातील बँका बंद राहणार आहेत. यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे.

Bank Holiday List In January l जानेवारी 2025 मध्ये किती दिवस बँका बंद राहणार :

1 जानेवारी 2025 : नववर्ष/ देशातील बहुतांश राज्यात बँका बंद
5 जानेवारी 2025 : रविवार
11 जानेवारी 2025 : दुसरा शनिवार
12 जानेवारी 2025 : रविवार/ स्वामी विवेकानंद जयंती
14 जानेवारी 2025 : मकर संक्रांत/ पोंगल निमित्तानं आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणामध्ये बँका बंद
15 जानेवारी 2025 : तिरुवल्लुवर दिवस, माघ बिहू आणि संक्रांतीनिमित्त तामिळनाडू, आसाम आणि इतर राज्यांमध्ये बँका बंद
16 जानेवारी 2025 : उज्जावर तिरुनल/ तामिळनाडूतील बँका बंद
19 जानेवारी 2025 : रविवार / आठवडी सुट्टी
22 जानेवारी 2025 : इमोइन/ मणिपूरमध्ये बँकांना रजा
23 जानेवारी 2025 : नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती/ मणिपुर, ओडिशा, पंजाब, सिक्किम, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर आणि दिल्ली
25 जानेवारी 2025 : चौथा शनिवार
26 जानेवारी 2025 : प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी 2025 : सोनम लोसर/ सिक्किममध्ये सुट्टी

News Title : Bank Holiday List In January

महत्वाच्या बातम्या –

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर!

आज ‘या’ 6 राशीच्या व्यक्ती मालामाल होणार!

बीडमध्ये पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, अखेर त्याला उचललं!

पुणेकरांनो….,थर्टीफर्स्टला घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचा!

एअरटेल ग्राहकांना मोठा फटका! फोन, इंटरनेट सेवा ठप्प

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now