Bank Fraud | बीड जिल्ह्यातील एका बड्या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेटमध्ये मोठा घोटाळा झाल्याची माहिती उघड झाली आहे. या बँकेच्या बीड जिल्ह्यात तीन आणि धाराशिव जिल्ह्यात दोन अशा 5 शाखा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या बँकेत तब्बल 159 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. (Bank Fraud)
तर, ठेवीदारांनी थेट 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. या बँकेचे एकूण सत्तर हजारांच्या आसापास खातेदार आहेत. त्यांना जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवत त्यांच्याकडून ठेवी घेण्यात आल्या होत्या. या प्रकरणी आतापर्यंत 2 हजार जणांनी तक्रार दाखल केली आहे.
बीड जिल्ह्यातील बँकेत घोटाळा
बँकेत 159 कोटींचा घोटाळा करणारा मुख्य प्रवर्तक व मुख्य आरोपी बबन शिंदे याला उत्तरप्रदेशच्या मथुरा येथून अटक करण्यात आली आहे. बीड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बबन शिंदे हा साधूची वेशभूषा करून वृंदावनमध्ये वास्तव्य करत होता. कोटींचा घोटाळा करून तो फरार झाला होता.
बबन शिंदे फरार झाल्यापासून तो नेपाळसह देशातील विविध ठिकाणी फिरल्याची माहिती देखील समोर आली आहे. 3 जुलैपासून तो फरार होता. सतत वेशभूषा बदलून व सीमकार्ड बदलून दिल्ली, नेपाळ, आसाम, ओरिसा, उत्तर प्रदेश अशा विविध ठिकाणी तो लपून बसला होता.(Bank Fraud)
मुख्य आरोपी अटकेत
अखेर आरोपी बबन शिंदे हा कृष्ण मंदिर वृंदावन येथे वेश बदलून साधूच्या वेशात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी त्याला एका खोलीमध्ये छापा मारून पकडण्यात आले.(Bank Fraud)
News Title : Bank Fraud in Jijau Ma Saheb Multistate
महत्वाच्या बातम्या-
ऑक्टोबरमध्ये तब्बल ‘एवढ्या’ दिवस बॅंका राहणार बंद!
राज्यातील ‘या’ मल्टीस्टेटवर ईडीची मोठी कारवाई!
नवरात्रीचे 9 दिवस ‘या’ 3 राशींसाठी ठरणार भाग्याचे!
बिग बॉस मराठी 5 च्या विजेत्याचं नाव समोर! सोशल मीडियावर चर्चेला उधाण
परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो व रेड अलर्ट जारी






