बंडू आंदेकरच्या ‘त्या’ कृत्याने महाराष्ट्र हादरला; पोलिसांनाही बसला धक्का

On: September 23, 2025 10:13 AM
Andekar Gang
---Advertisement---

Bandu Andekar | पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणानं महाराष्ट्र हादरला आहे. या हत्येच्या तपासात बंडू आंदेकर (Bandu Andekar) आणि त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून, पोलिसांनाही या खुलाशामुळे धक्का बसला आहे.

हत्या प्रकरणातील धक्कादायक आरोप समोर :

काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर (Ayush Komkar) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या खुनामागे बंडू आंदेकर आणि त्याची टोळी असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात आंदेकर टोळीतील काहींना अटकही झाली आहे.

पोलिस तपासात असं उघड झालं की, बंडू आंदेकर (Bandu Andekar) याचा मुलगा वनराज आंदेकर (Vanraj Andekar)  याची गेल्या वर्षी हत्या झाली होती. त्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकर याने स्वतःच्या नातवाचं, म्हणजेच आयुष कोमकरचा खून घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे.

Bandu Andekar | खंडणीचा काळा कारभार उघड :

तपासादरम्यान आंदेकर टोळीच्या खंडणी व्यवसायाचा मोठा खुलासा झाला आहे. गेल्या दहा वर्षांत आंदेकर टोळीने (Andekar Gang) पुण्यातून तब्बल वीस कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचं समोर आलं आहे. विशेषतः गणेश पेठ येथील मच्छी मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून दरमहा १५ ते २० लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याची माहिती मिळाली आहे.

या कारवायांमध्ये बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर आणि शिवराज आंदेकर अशी संपूर्ण टोळी सामील असल्याचं स्पष्ट झालं आहे. व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करून त्यांनी हा गैरव्यवसाय दशकभर सुरू ठेवला होता.

अवैध बांधकामावर कारवाई :

दरम्यान, दुसरीकडे पुण्यातील नाना पेठ भागात महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने बंडू आंदेकरच्या (Bandu Andekar) अवैध बांधकामांवर हातोडा चालवला. आंदेकरचे फ्लेक्स काढून टाकण्यात आले, तर त्याच्या बँक खात्यांवरही कारवाई झाली आहे.

यावेळी तब्बल २७ बँक खाती पोलिसांना आढळून आली असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. ही सर्व खाती गोठवण्यात आली असून, अवैध संपत्तीचा तपास सुरू आहे.

News Title : Bandu Andekar shocking extortion racket exposed in Ayush Komkar murder case

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now