राजकीय घडामोडींना वेग! बच्चू कडू शरद पवारांच्या भेटीला, महायुतीला देणार धक्का?

On: August 10, 2024 11:46 AM
Bachchu Kadu met Sharad Pawar
---Advertisement---

Bachchu Kadu | प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. आज (10 ऑगस्ट ) सकाळीच 8 वाजता मोदीबागेत शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट झाली. या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. या भेटीत त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?, यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवारांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पवारांची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्ही सरकारला 1 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ, असं म्हटलं.

बच्चू कडू आणि शरद पवार यांची भेट

“माझी आणि शरद पवारांची भेट आधीच ठरली होती. मी काल ज्या मुद्द्यांवर आंदोलन केलं, त्याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली. जाती-धर्मावर जसं राजकारण होतंय, तसं शेतकरी, शेतमजूर दिव्यांग आणि जे कोणी अडचणीत असणारी लोकं आहेत, त्यांच्यावर राजकारण व्हायला पाहिजे. आम्ही यावर पवारांशी चर्चा केली.”, असं बच्चू कडू (Bachchu Kadu)म्हणाले.

तसंच अजून तरी शरद पवारांसोबत जाण्याचा कोणताही विचार केलेला नाही. आम्ही सरकारला 1 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यानंतर आम्ही पुढील काय तो निर्णय घेऊ, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू आणि महायुतीमध्ये धुसफूस चालू आहे. त्यातच आज बच्चू कडू थेट शरद पवारांच्या भेटीला गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सरकारला 1 सप्टेंबरपर्यंत वेळ

शिवसेना पक्षात जेव्हा फुट पडली तेव्हा बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सतत वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे बच्चू कडू आता महाविकास आघाडीची वाट धरणार काय?, अशा चर्चा रंगत आहेत. त्यांनी सरकारला आता 1 सप्टेंबर पर्यंत वेळ दिला आहे.

तसंच माझ्या नाराजीवर काहीही अवलंबून नाही. माझ्यासाठी शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग ज्यांनी आमच्यावर अफाट प्रेम केलं, त्यांच्या नाराजीचा सूर आम्ही सरकारसमोर ठेवत असतो. तोच आमचा विषय असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत. तसेच, मी अजून महाविकास आघाडीत जाण्याबद्दल निर्णय घेतलेला नाही, असंही बच्चू कडू (Bachchu Kadu)यांनी स्पष्ट केलं आहे.

News Title :  Bachchu Kadu met Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून ‘या’ दिवशी अहमदनगरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर!

सिनेविश्वात शोककळा! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

विनेश फोगाटला मेडल मिळणार?, अपात्रतेच्या सुनावणीत काय घडलं?

पावसाची विश्रांती; ‘या’ तारखेनंतर पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

या 2 राशींवर शनीदेव नाराज? नुकसान होण्याची शक्यता

Join WhatsApp Group

Join Now