विधानसभेपूर्वीच राज्यात राजकीय स्फोट?, बच्चू कडूंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

On: October 18, 2024 12:11 PM
Bachchu Kadu Big Statement on Election
---Advertisement---

Bachchu Kadu | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यंदा राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. तर, राज्यात आणखी एक म्हणजेच तिसरी आघाडी निर्माण होणार असल्याचं देखील चित्र दिसून येत आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी महायुतीविरोधातच आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं आहे. अशात त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचं वक्तव्य चर्चेत आलंय.

4 नोव्हेंबरला मोठा स्फोट करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी भेट घेतली असल्याचं बोललं जात होतं. याबाबत आता बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “मविआ आणि महायुतीला आता जनता कंटाळली आहे. दोन्ही युती-आघाडीत जागावाटपामध्ये तिढा आहे. भाजप आणि काँग्रेस एकच आहेत. अर्थकारणात काही बदल झालेला नाही. त्यामुळे आम्ही या मुद्यांवर लोकांना घेऊन जाऊ. चार तारखेला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल.”, असं बच्चू कडू (Bachchu Kadu)म्हणाले आहेत.

माझ्या मतदारसंघातील लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी तिथूनच लढणार, असे म्हणत बच्चू कडूंनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. तसेच, 4 नोव्हेंबरला सगळं स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट पाहायला मिळणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले बच्चू कडू?

तसेच, मुख्यमंत्री शिंदे यांची मी भेट घेतलीच नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलोच नव्हतो, असं बच्चू कडू म्हणाले. तसेच, आम्ही आघाडी आणि युती दोघांचाही एन्काऊंटर करणार, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. आता बच्चू कडू नेमकं काय करणार ते 4 तारखेलाच स्पष्ट होईल.

यावेळी त्यांनी भाजपचे नेते राजन तेली यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर देखील भाष्य केलं.  राजन तेली यांनी भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. आता ते उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर प्रश्न केला असता बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले की, राजन तेली किंवा त्यांच्याबद्दल मला माहिती नाही.

News Title –  Bachchu Kadu Big Statement on Election

महत्त्वाच्या बातम्या-

बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रुफ कार; किंमत ऐकून व्हाल थक्क

मोठी बातमी! आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?, मतदारसंघही ठरला?

सणासुदीत ग्राहकांना दिलासा! सोनं झालं स्वस्त?, जाणून घ्या भाव

उद्धव ठाकरेंचा महायुतीला दुहेरी धक्का; दोन बडे नेते शिवसेनेच्या वाटेवर?

आज शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 3 राशींना होणार धनलाभ!

Join WhatsApp Group

Join Now