Aishwarya Rai ची ‘ही’ गोष्ट मला खटकते, बच्चन कुटुंबातील व्यक्तीने केला गौप्यस्फोट

On: December 19, 2023 5:25 PM
aishwarya rai
---Advertisement---

Aishwarya Rai | बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु आहेत. अमिताभ बच्चन यांनी देखील ऐश्वर्या रायला आपल्या अधिकृत सोशल मीडियावरुन अनफाॅलो केल्याच्या बातमीने विषयाला तोंड फुटलं होतं.

दरम्यान, त्यानंतर आता बच्चन कुटुंबातील एका व्यक्तीने ऐश्वर्या राय बद्दल मोठा खुलासा केला आहे. ऐश्वर्या रायच्या सवयींबाबत बच्चन कुटुंबातील व्यक्तीने वक्तव्य केलं आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिषेक बच्चनची बहिण श्वेता बच्चन आहे.

काय म्हणाली श्वेता बच्चन?

‘काॅफी विथ करण’ या रियलिटी शोमध्ये अभिषेक बच्चनची बहिण श्वेता बच्चनने हजेरी लावली होती. यावेळी ऐश्वर्याच्या (Aishwarya Rai) वाईट सवयींबद्दल बोलताना श्वेताला विचारण्यात आलं.

विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत श्वेता म्हणाली, “ऐश्वर्याने कॉल उचलला नसेल तर पुन्हा कॉल बॅक करायला ती खूप वेळ लावते. तिची हीच सवय मला अजिबात आवडत नाही.” या शोमध्ये श्वेताने ऐश्वर्याचं कौतुकसुद्धा केलं. “तिने स्वत:च्या हिंमतीवर सगळं कमावलं.

पुढे काय म्हणाली?

ऐश्वर्या एक उत्तम आई आहे. शिवाय एक स्ट्राँग महिला म्हणून मी तिच्याकडे बघते. दरम्यान, श्वेताच्या मुलाने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे. झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अगस्त्यने सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं आहे.

ऐश्वर्याचा अगस्त्यला पठिंबा-

या चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होतं. यावेळी ऐश्वर्यासुद्धा अगस्त्यला पाठिंबा देण्यासाठी तिथे पोहोचली होती. अगस्त्य आणि ऐश्वर्याचा मजेशीर व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ती गंमतीने त्याचे गाल ओढताना दिसली होती.

News Title : bachchan member dont like aishwarya rais habbit

थोडक्यात बातम्या-

IPL 2024 Auction | बेंगलोरनं सोडल्यानं होता परेशान, पंजाबनं लावलेली बोली ऐकून उडाले होश!

Amitabh Bachchan यांनी अखेर सांगून टाकलं… म्हणाले, “हाच माझा खरा वारसदार!”

IPL Auction 2024 | ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या Pat Cumminsवर पैशांचा पाऊस, बोली थांबता थांबेना… शेवटी

IPL Auction 2024 | वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला नडला, आता भारतानंच केलं मालामाल

IPL Auction 2024 | रचिन रवींद्र चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात, मोजले ‘इतके’ कोटी रुपये

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now