बाबा वेंगाची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरणार? जगात मोठे संकट येणार? वाचा सविस्तर!

On: October 8, 2025 1:00 PM
Baba Vanga Predictions
---Advertisement---

Baba Vanga Predictions | बुल्गारियातील प्रसिध्द भविष्यवेती बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचे इतिहासात दिसते. त्यांनी जगातील अनेक घडामोडींची भाकिते वर्षांपूर्वीच केली होती. आता त्यांच्या एका नव्या भविष्यवाणीमुळे जगभरात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी 2088 मध्ये मानवजातीला हादरवणाऱ्या एका विषाणूचा इशारा दिला होता, ज्यामुळे माणसांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. (Baba Vanga Predictions)

2088 मध्ये पसरणार घातक विषाणू? :

बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत सांगितले आहे की आजपासून सुमारे 63 वर्षांनंतर, म्हणजेच 2088 मध्ये (Baba Vanga virus 2088) एक अज्ञात विषाणू जगभर पसरेल. हा विषाणू मानवाच्या शरीरात असा बदल घडवेल की माणसे लवकर म्हातारी होऊ लागतील. म्हणजेच वृद्धत्वाची प्रक्रिया इतकी वेगाने होईल की माणसांचे आयुष्य कमी होईल, आणि लहान वयातच मृत्यू जवळ येऊ लागेल.

ही भविष्यवाणी वाचून आजच्या काळातही अनेक तज्ज्ञ चिंतेत पडले आहेत. कारण बदलते हवामान, प्रयोगशाळेत तयार होणारे विषाणू आणि जैविक शस्त्रास्त्रांचा वाढता धोका — हे सर्व घटक पाहता बाबा वेंगाची ही भविष्यवाणी गंभीर चिंतेचा विषय बनली आहे.

Baba Vanga Predictions | कोण होत्या बाबा वेंगा? :

बाबा वेंगा यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा दिमित्रोवा होते. त्यांचा जन्म 1911 साली आजच्या उत्तर मॅसेडोनियामध्ये झाला. वयाच्या 12 व्या वर्षी बवंडरामुळे त्यांची दृष्टी गेली, परंतु अनुयायांचा असा विश्वास आहे की त्या घटनेनंतर त्यांना भविष्य पाहण्याची शक्ती मिळाली. (Baba Vanga Predictions)

वयाच्या तिसाव्या वर्षीच त्यांनी केलेल्या भाकितांमुळे त्या प्रसिद्ध झाल्या. बुल्गारियाचे राजा बोरिस तृतीय आणि सोव्हिएत नेते लिओनिद ब्रेझनेव्ह यांसारखे दिग्गजही त्यांच्या सल्ल्यासाठी जात असत. बाबा वेंगा यांचे निधन 1996 मध्ये झाले, पण त्यांच्या भविष्यवाण्या आजही चर्चेचा विषय ठरतात.

पूर्वीच्या भाकितांतही सत्यता! :

अनेक रिपोर्टनुसार, बाबा वेंगाने अमेरिकेतील 9/11 हल्ला, तसेच 2022 मध्ये ब्रिटनमध्ये आलेल्या महापुराची अचूक भविष्यवाणी केली होती. त्यामुळेच त्यांना “बाल्कनची नास्त्रेदमस” म्हटले जाते. आता त्यांच्या या नव्या भविष्यवाणीमुळे ‘जलद वृद्धत्वाचा विषाणू’, मानवजातीसमोर एक नवा प्रश्न उभा राहिला आहे. (Baba Vanga virus 2088)

सहा दशकांनंतरची ही भविष्यवाणी असली तरी, आजच्या परिस्थितीत ती पूर्णपणे काल्पनिक म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीसोबत जैविक प्रयोग आणि हवामानातील अस्थिरता ही बाब खरोखरच चिंताजनक बनली आहे.

News Title: Baba Vanga’s terrifying 2088 prediction warns of a deadly virus that could age humans rapidly

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now