खतरनाक! फक्त 2 महिन्यांत मोठं संकट? बाबा वेंगाची 2025 साठी भयानक भविष्यवाणी

On: May 22, 2025 10:57 AM
Baba Vanga Predictions
---Advertisement---

Baba Vanga 2025 prediction | बुल्गारियाच्या प्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगाच्या 2025 मधील भाकितांमुळे जगभरात चर्चेला उधाण आले आहे. अंधत्वानंतर भविष्यकथन करण्यास सुरुवात करणाऱ्या वेंगाने अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्यात काही घटनांचा अचूक अंदाज असल्याचा दावा तिचे समर्थक करतात. 2025 साली जगासाठी धोक्याचा इशारा देणारी तिची नवी भाकीतं आता चर्चेत आली आहेत. (Baba Vanga 2025 prediction)

आर्थिक संकट आणि नैसर्गिक आपत्तींचाही इशारा :

विशेषतः जुलै 2025 मध्ये जगावर भीषण संकट ओढवेल, असा दावा वेंगाने केला होता. हे संकट नैसर्गिक असेल की राजकीय किंवा दहशतवादी, याबाबत स्पष्ट उल्लेख नसला तरी, “दोन महिन्यांत जगासाठी मोठा धोका निर्माण होईल” असे ती म्हणाली होती. त्यामुळे अनेकांची नजर जुलै महिन्याकडे लागली आहे.

वेंगाने 2025 मध्ये जागतिक आर्थिक संकटाचा अंदाज वर्तवला होता. तिच्या मते, “जगभरातील बाजारपेठा पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळतील आणि अनेक देश आर्थिक संकटात सापडतील.” सध्याच्या अस्थिर आर्थिक वातावरणात ही भविष्यवाणी विशेषतः विचारात घेतली जात आहे.

Baba Vanga 2025 prediction | वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक; अंधश्रद्धेपासून सावध :

याशिवाय, तिने भूकंप, महापूर, आणि ज्वालामुखी उद्रेक यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाजही वर्तवला होता. अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर ज्वालामुखीचा उद्रेक होईल, असे तिचे भाकीत होते. अशा घटना वाढत असल्याने वेंगाच्या भविष्यवाणीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. (Baba Vanga 2025 prediction)

बाबा वेंगाच्या भाकितांवर शंभर टक्के विश्वास ठेवणे योग्य नाही, असा सल्ला वैज्ञानिक संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग देतात. तिच्या अनेक भविष्यवाण्यांवर शास्त्रीय आधार नाही, आणि त्याचे भक्कम पुरावेही नाहीत. त्यामुळे अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक विचारांचा अवलंब करावा, असा इशारा दिला जात आहे.

News Title: Baba Vanga’s Shocking 2025 Prediction: Global Crisis in Two Months?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now