जगात महामारी येणार, लोक लवकर म्हातारे होणार, बाबा वेंगाच्या ‘त्या’ भविष्यवाणीने धोक्याची घंटा

On: June 25, 2025 5:31 PM
Baba Vanga Predictions
---Advertisement---

Baba Vanga Prediction | कोरोनानंतर पुन्हा एकदा जगाला मोठ्या संकटाचा इशारा देणारी भविष्यवाणी समोर आली आहे. प्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगाने आपल्या एका भविष्यवाणीत म्हटले आहे की, येत्या काही वर्षांत एक असा व्हायरस येईल, जो मानवजातीसाठी अत्यंत धोकादायक ठरेल. या विषाणूमुळे लोक झपाट्याने म्हातारे होऊ लागतील आणि तरुणांची संख्या झपाट्याने घटू लागेल.

बाबा वेंगाच्या या भविष्यवाणीनंतर अनेक तज्ज्ञ आणि संशोधक याकडे गांभीर्याने पाहू लागले आहेत. तिच्या अनेक भाकितांप्रमाणेच हीही एक चिंता निर्माण करणारी शक्यता मानली जात आहे. तिचा दावा आहे की, 2088 मध्ये एक भयावह व्हायरस पसरवला जाईल, जो माणसांचे वय लवकर वाढवेल. त्यामुळे लहान वयातच वृद्धत्वाची लक्षणं दिसू लागतील.

2088 मध्ये संकट, 2097 पर्यंत परिणाम :

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2088 सालात हा नवा व्हायरस जगभर पसरू लागेल. या आजारामुळे लोक लहान वयातच म्हातारे दिसू लागतील. केस पांढरे होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, अशक्तपणा आणि वयोमानानुसार होणाऱ्या आजारांनी तरुण वयातच लोकांना ग्रासेल. हे संकट 2097 पर्यंत टिकेल, मात्र त्यानंतर हा आजार पूर्णतः नाहीसा होईल, असंही त्या भाकीतात म्हटलं आहे. (Baba Vanga Prediction)

साथीच्या आजारामुळे मानवजातीची रचना आणि लोकसंख्येचे प्रमाण बदलून जाईल. वृद्धांची संख्या वाढल्यामुळे सामाजिक व आर्थिक व्यवस्थेवरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढत्या वृद्धत्वामुळे आरोग्य सेवा, निवृत्ती योजना, आणि कामगार उपलब्धतेवर दबाव येऊ शकतो.

Baba Vanga Prediction | कलियुगातील भविष्यवाणीही खळबळजनक :

हिंदू धर्मग्रंथ विष्णू पुराणातसुद्धा कलियुगात मानवी आयुष्य कमी होईल, असा उल्लेख आहे. या ग्रंथानुसार, भविष्यात लोकांची आयुर्मर्यादा केवळ 20 वर्षांपर्यंतच मर्यादित राहील. इतकंच नव्हे तर लहान वयातच मुलांचे केस पांढरे होतील, आणि त्यांच्या लहान वयातच विवाहही होतील. मुलं 9-10 वर्षांचे आणि मुली 6-7 वर्षांची असतानाच त्यांना अपत्यप्राप्ती होईल, असं वर्णन विष्णू पुराणात केलेलं आहे. (Baba Vanga Prediction)

याशिवाय, या काळात मानवाच्या शरीरावर विशिष्ट चिन्ह गोंदवले जातील, ज्यावरून वयाचा अंदाज लावला जाईल. डोळे बारीक होणे, दृष्टिदोष लवकर निर्माण होणे, उंचीमध्ये घट होणे अशा शारीरिक बदलांचाही उल्लेख आहे. यामुळे बाबा वेंगाच्या भविष्यवाणीला धार्मिक दृष्टिकोनातूनही पुष्टी मिळते.

News Title: Baba Vanga’s Scary Prediction: Global Virus Will Cause Rapid Ageing by 2088

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now