Baba Siddique | माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना लगेच ताब्यात घेतलं. सिद्दीकींच्या हत्येमध्ये तिघांचा समावेश असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे, तर तिसरा आरोपी फरार असल्याचं म्हटलं जात आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येसाठी अडीच लाख रूपयांची सुपारी मिळाली. बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर 50 – 50 हजार रूपये त्यांना मिळणार होते. दरम्यान, आता या आरोपींबदल धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुण्यात वास्तव्यास-
समोर आलेल्या माहितीनूसार, सिद्दीकी (Baba Siddique) हत्येप्रकरणातील 2 आरोपी हे हारियाणा आणि उत्तरपरदेश आहेत. तर त्यांच्यातील तिसरा फरार आरोपी हा गेल्या पाच सहा वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होता.
एवढंच नाही तर, पुण्यात पाच ते सहा वर्षांपासून एका स्कॅप डिलरकडे काम करतोय. त्याने धर्मराज नावाच्या 19 वर्षीय आरोपीला काही महिन्यांपूर्वी पुण्यात बोलवून घेतलं होतं.
पुण्यातील शिवा नावाचा तिसरा आरोपी सध्या फरार आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके पुणे तसेच परराज्यात रवाना झाले आहेत. या हत्या प्रकरणात आणखी एक आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस या आरोपीचाही शोध घेत आहेत.
आरोपींची भेट कुठे झाली?
सिद्दीकी (Baba Siddique) यांची हत्या करणारे चार पैकी तीनजण तुरुंगात एकत्र होते. तिथे बिश्नोई गँगच्या एका शूटरशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर हे तीनही आरोपी बिष्णोई गँगमध्ये सहभागी झाले. त्यानंतर त्यांना बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी अडीच लाख रूपयांची सुपारी मिळाली.
News Title : Baba siddique third accused lives in pune
महत्त्वाच्या बातम्या-
‘…म्हणून बाबा सिद्दीकीची हत्या केली’,; बिश्नोई गँगच्या खुलाशाने सगळीकडे खळबळ
बिश्नोई गँगकडून सिद्दीकींच्या हत्येचा खुलासा, ‘त्या’ पोस्टमुळे एकच खळबळ
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानचा मोठा निर्णय!
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी खळबळजनक माहिती समोर!
बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांची चौकशीत अत्यंत धक्कादायक कबुली!






