बाबा सिद्दीकींच्या हत्ये मागे या गँगचा हात? माहिती समोर येताच सगळीकडे खळबळ

On: October 13, 2024 1:07 PM
Baba Siddique Murder
---Advertisement---

Baba Siddique Murder l गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात गुन्हेगारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आता मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या आहेत, मात्र या धक्कादायक घटनेत बाबा सिद्दीकी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दोन आरोपीना घेतलं ताब्यात :

दसऱ्याच्या दिवशी (12 ऑक्टो) रात्री नऊच्या सुमारास तीन अज्ञात तरुणांनी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. यावेळी हल्लेखोरांनी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला आहे.

या गोळीबारात अज्ञात तरुणांनी पाच ते सहा गोळ्या झाडल्या आहेत. मात्र त्यामधील तीन गोळ्या बाबा सिद्दीकी यांना लागल्या. त्यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र आता या धक्कादायक घटनेत दोन हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामधील दोन आरोपींपैकी एक आरोपी हा हरियाणाचा आणि दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती समोर आली आहे.

Baba Siddique Murder l यामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात आहे का? :

या धक्कादायक घटनेमागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा यामागे हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी देखील त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर देखील गोळीबार केला होता.

कारण राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे निकटवर्तीय होते. तसेच बाबा सिद्दिकी यांनी सलमान खानला देखील वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळे बाबा सिद्दिकी यांच्यावर बिश्नोई गँगने हा गोळीबार केला आहे का? याचा सखोल तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

News Title – Baba Siddique Murder

महत्त्वाच्या बातम्या-

सिद्दीकींना गोळी मारण्यामागचं धक्कादायक कारण समोर

ब्रेकिंग न्यूज! राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या

अजित पवार गटाच्या ‘या’ आमदाराने केली रावणाची महाआरती!

मी राजकारणाला चिटकून बसणारी नाही…पंकजा मुंडे फक्त एकाच गोष्टीला घाबरते

“आमचा धक्का लागतो म्हणता, मग आता..”; जरांगे पाटलांची सरकारला केली थेट विचारणा!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now