Shefali Jariwala Death | ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala Death) हिचं वयाच्या 42व्या वर्षी अचानक निधन झाल्यानं संपूर्ण इंडस्ट्री हादरून गेली आहे. तिच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण अँटी-एजिंग सप्लिमेंट्स आणि चुकीच्या जीवनशैलीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पतंजली आयुर्वेद संस्थापक बाबा रामदेव यांनी शेफालीच्या मृत्यूवर भाष्य करताना ‘हार्डवेअर-सॉफ्टवेअर’चा संदर्भ दिला आणि वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेक युजर्सनी त्यांच्या संवेदनाशून्य भाषेचा तीव्र निषेध केला आहे.
“हार्डवेअर ठीक होतं, पण सॉफ्टवेअरमध्ये बिघाड…”
“त्यांचं हार्डवेअर ठीक होतं, पण सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला होता…” “लोकांनी त्यांच्या जीवनशैलीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराच्या सिस्टीममध्ये बिघाड होतो…”, यासोबतच त्यांनी आहार, शिस्त, आणि डीएनएशी नातं जोडणं या विषयावरही भाष्य केलं. पण, शेफालीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं टेक्निकल उदाहरण देणं हे नेटिझन्सना अजिबात आवडलं नाही. (Shefali Jariwala Death)
रामदेव बाबांच्या वक्तव्यानंतर अनेकांनी इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर त्यांच्यावर जोरदार टीका केली. काही युजर्सनी लिहिलं, “तिच्या आत्म्याला शांती मिळो… पण हा मूर्खपणा थांबवा”, तसेच “कृपया तिला जाऊ द्या… तुम्ही तिला पुन्हा पुन्हा मारताय” अशा प्रकारच्या कमेंट येत आहेत.
Shefali Jariwala Death | शेफालीच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट नाही :
शेफालीच्या मैत्रिणी पूजा घईनं सांगितलं की मृत्यूच्या काही तास आधी तिनं व्हिटॅमिन-C ची IV ड्रिप घेतली होती. काही रिपोर्ट्सनुसार, उपवास, लो ब्लड प्रेशर आणि अँटी-एजिंग ट्रीटमेंटमुळे तिला हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज वर्तवला जातो.
पोलिस तपास सुरू असून, मेडिकल रिपोर्ट्स आणि ड्रग ट्रेसिंगवरून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.






