Ayush Mhatre l आयपीएल 2025 हंगामात चेन्नई सुपर किंग्जला (CSK) मोठा धक्का बसला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या फ्रॅक्चरमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा एमएस धोनीकडे (MS dhoni) आले आहे. अशा स्थितीत संघाने एक धाडसी निर्णय घेत, अवघ्या 17 वर्षांचा मुंबईचा सलामीवीर फलंदाज आयुष म्हात्रेला संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे.
पृथ्वी शॉच्या पुढे आयुष म्हात्रेला मिळाली संधी :
आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) सध्या संघात औपचारिकरित्या दाखल झालेला नसला, तरी फ्रँचायझीने त्याला लवकरात लवकर सामील होण्यास सांगितले आहे. त्याचा समावेश शनिवारी अधिकृतपणे करण्यात आला. आयपीएल 2025 लिलावात आयुषची बेस प्राईस 30 लाख रुपये होती, मात्र तो तेव्हा विकला गेला नव्हता.
चेन्नई सुपर किंग्जने (CSK) काही दिवसांपूर्वी मुंबईतील आयुष म्हात्रे, गुजरातचा उर्विल पटेल आणि उत्तर प्रदेशचा सलमान निजार यांना ट्रायल्ससाठी बोलावले होते. या खेळाडूंमध्ये आयपीएल लिलावात न विकला गेलेला पृथ्वी शॉही होता. मात्र, संघ व्यवस्थापनाने आयुषच्या (Ayush Mhatre) कौशल्यावर विश्वास ठेवत त्याची अंतिम निवड केली आहे.
Ayush Mhatre l आज एकाना स्टेडियमवर सातवा सामना पार पडणार :
सीएसकेचा सध्याचा फॉर्म चिंताजनक आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर संघाने सलग पाच सामने गमावले आहेत. (Ayush Mhatre)
सध्या चेन्नई संघ लखनऊमध्ये आहे आणि सोमवारी एकाना स्टेडियमवर त्यांचा सातवा सामना पार पडणार आहे. पुढचा महत्त्वाचा सामना 20 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.






