आयुष कोमकर खून प्रकरणात ‘या’ लेडी डॉनचा संबंध? पोलीस तपास सुरु

On: September 18, 2025 6:30 PM
Ayush Komkar Murder Case
---Advertisement---

Ayush Komkar Murder Case | पुण्यातील तरुण आयुष कोमकरच्या खुनानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. 5 सप्टेंबर रोजी झालेल्या या घटनेमागे टोळीयुद्ध आणि सूडराजकारणाचे संकेत तपासात समोर येत आहेत. माजी नगरसेवक वनराज आंदेकर (vanraj Andekar) यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुषवर गोळ्या झाडण्यात आल्या, अशी माहिती आधीच पुढे आली होती. आता पोलिस तपासात महिलांचेही नाव पुढे आल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. (Ayush Komkar Murder Case)

आंदेकर कुटुंबाभोवती तपासाचा फास :

पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत आंदेकर कुटुंबावर कारवाई केली आहे. वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची पत्नी सोनाली आंदेकर (Sonali Andekar) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर आयुष कोमकर हत्येत सहभागाचा संशय व्यक्त केला जात आहे. यासोबतच आरोपी कृष्णा आंदेकरची पत्नी प्रियांका आंदेकर हिलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या दोन्ही महिलांच्या अटकेनंतर आता चर्चांना उधाण आले आहे. खुनामागे महिलांचा हात असल्याची शंका अधिक बळावली आहे. “लेडी डॉन” अशी उपमा देऊन या प्रकरणाकडे पाहिले जात असून महिलांची भूमिका मास्टरमाईंड म्हणून होती का? हा मोठा प्रश्न आता पोलिसांसमोर आहे.

Ayush Komkar Murder Case | कसून चौकशीला सुरुवात :

सोनाली आंदेकर आणि प्रियांका आंदेकर (Priyanka Andekar) यांची चौकशी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून केली जात आहे. या चौकशीतून आयुष कोमकर खून प्रकरणातील अनेक गुपिते उलगडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत बरेच आरोपी समोर आले असले तरी महिलांची एन्ट्री ही तपासातील मोठी वळण मानली जात आहे.

आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते या खुनामागील खऱ्या मास्टरमाईंडचा छडा लागण्यावर. महिलांचा सहभाग फक्त सहकारी म्हणून होता की त्यांनीच योजना आखली होती? पोलिस चौकशीनंतर या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

News Title: Ayush Komkar Murder: Police Detain Two Women from Andekar Family – Is a Lady Don the Mastermind?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now